परिवहन मंत्रालयाचे म्हणणे आहे
परिवहन मंत्रालयाच्या मते, सुमारे 45% DL आणि RCमध्ये चुकीचे मोबाईल नंबर नोंदवलेले असतात. ज्यामुळे लोकांना ट्रॅफिक चलन आणि महत्त्वाची माहिती वेळेवर मिळत नाही. म्हणूनच, योग्य फोन नंबर असणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला लायसन्स आणि आरसीशी संबंधित सूचना वेळेवर मिळत राहतील.
योग्य मोबाईल नंबर का महत्त्वाचा आहे?
advertisement
तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीमध्ये योग्य फोन नंबर असेल, तर तुम्हाला ई-चलान आणि इतर माहिती वेळेवर मिळते. याशिवाय, वाहनांशी संबंधित सेवा जसे की विमा, परमिट आणि कर याबद्दलची माहिती देखील नंबरवर उपलब्ध आहे. तसेच, DigiLocker mParivahan अॅपवर कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन देखील सहजपणे केली जाते.
लायसेन्सशिवाय चालवता येतील या स्कूटर! टॉप स्पीड आहे 25km, विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑप्शन
Driving License आणि RCमध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा
1. सर्वप्रथम parivahan.gov.in या पोर्टलवर जा.
2. आता ऑनलाइन सेवांमध्ये वाहन संबंधित सेवांचा पर्याय निवडा.
3. यानंतर इतर सेवा (मिस) वर टॅप करा.
4. तेथे तुम्हाला अपडेट मोबाईल नंबरचा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.
5. आता तुमच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि चेसिस नंबर भरा.
6. यानंतर तुम्हाला नवीन फोन नंबर भरावा लागेल आणि Generate OTP वर क्लिक करावे लागेल.
7. आता नवीन नंबरवर मिळालेला OTP एंटर करा आणि सबमिट करा.
फॅमिलीसाठी कार खरेदी करताय? या 4 गाड्या आहेत बेस्ट, मिळते 5 स्टार रेटिंग
काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
लक्षात ठेवा की, फोन नंबर तुमच्या नावावर नोंदणीकृत असावा आणि OTP व्हेरिफिकेशननंतरच मोबाईल नंबर अपडेट केला जाईल. ही छोटी प्रक्रिया पूर्ण होताच, नवीन नंबर डीएल आणि आरसीवर नोंदणीकृत होईल आणि इतर सर्व सूचना थेट तुमच्या नवीन नंबरवर येतील.
