TRENDING:

Hyundai ने आणली 'बेबी Creta', फिचर्स आणि किंमत पाहून लगेच कराल बूक!

Last Updated:

Hyundai Venue 2025: नव्या वर्षात नवी गाडी घेणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण ह्युंदाईने आपली नवी व्हेन्यू 2025 ही SUV बाजारात लाँच केली असून, ती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. तिचा लुक क्रेटासारखा असला, तरी तो अधिक कॉम्पॅक्ट, स्पोर्टी आणि तरुण दिसणारा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नव्या वर्षात नवी गाडी घेणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण ह्युंदाईने आपली नवी व्हेन्यू 2025 ही SUV बाजारात लाँच केली असून, ती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. तिचा लुक क्रेटासारखा असला, तरी तो अधिक कॉम्पॅक्ट, स्पोर्टी आणि तरुण दिसणारा आहे. या गाडीची किंमतसुद्धा लोकांच्या बजेटमध्ये बसणारी आहे. फक्त ₹7 .90 लाखांपासून सुरू होणारी ही SUV तिच्या फीचर्स आणि डिझाईनमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
advertisement

ह्युंडाई व्हेन्यू 2025: नवी रचना आणि दमदार लुक

ह्युंडाईने कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा आपली छाप सोडण्यासाठी ही नवी व्हेन्यू बाजारात आणली आहे. या गाडीचा बाहेरचा लुक पूर्णपणे बदलण्यात आला असून, पुढील बाजूस नवा आयताकृती ग्रिल, क्वाड-बीम एलईडी हेडलॅम्प्स आणि स्पोर्टी बंपर डिझाईन देण्यात आले आहेत. गाडीची रुंदी आणि उंची वाढवण्यात आली असल्याने आतल्या भागात अधिक जागा मिळते. एकूणच ही गाडी दिसायला लहान क्रेटासारखी भासत असली, तरी तिचा लुक अधिक तरुण आणि डायनॅमिक वाटतो.

advertisement

इंजिन आणि परफॉर्मन्स

ह्युंडाईने व्हेन्यू 2025 मध्ये एकूण तीन वेगवेगळे इंजिन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत, पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारांमुळे प्रत्येक ग्राहकाला आपल्या वापरानुसार योग्य पर्याय निवडता येतो.

advertisement

  • ह्युंदाई व्हेन्यू 2025 मध्ये तीन प्रकारची इंजिनं देण्यात आली आहेत- दोन पेट्रोल आणि एक डिझेल.
  • पहिलं 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 83 बीएचपी पॉवर आणि सुमारे 18  किमी/लीटर मायलेज देते.
  • advertisement

  • दुसरं 1.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन अधिक दमदार असून 120  बीएचपी पॉवर देतं, आणि त्याचा मायलेज सुमारे 20 किमी/लीटर आहे.
  • तर 1.5-लीटर डिझेल इंजिन जास्त टॉर्क आणि चांगले मायलेज देतं — सुमारे 20.90 किमी/लीटर.
  • advertisement

  • तीनही इंजिनं मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येतात, आणि परफॉर्मन्स तसेच इंधन बचतीचा उत्तम समतोल साधतात.

आतील रचना आणि फीचर्स

  • नवीन व्हेन्यूच्या केबिनमध्ये ह्युंदाईने प्रीमियम अनुभव देण्यासाठी मोठे बदल केले आहेत.
  • दोन 12.3-इंच टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आले आहेत – एक इन्फोटेन्मेंट सिस्टीमसाठी आणि दुसरी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी.
  • मागील सीट्स दोन टप्प्यांत मागे-पुढे झुकवता येतात, त्यामुळे बूटस्पेस वाढवता येतो.
  • यामध्ये 8-स्पीकर बोस साउंड सिस्टम देण्यात आली आहे, ज्यामुळे गाडीतील संगीत अनुभव एक वेगळ्याच दर्जाचा वाटतो.

सुरक्षा फीचर्स

सुरक्षेच्या दृष्टीने ह्युंडाईने यात लेव्हल 2 ADAS सूट दिला आहे, ज्यात खालील आधुनिक फीचर्स समाविष्ट आहेत,

  • लेन कीप असिस्ट (Lane Keep Assist)
  • क्रूझ कंट्रोल (Cruise Control)
  • फॉरवर्ड कोलिजन अव्हॉइडन्स असिस्ट (Forward Collision Avoidance Assist)

किंमत आणि व्हेरिएंट्स

 

ह्युंदाई व्हेन्यू 2025 ही SUV एकूण सात व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे.

 

  1. बेस व्हेरिएंटची किंमत ₹7.90 लाखांपासून सुरू होते.
  2. तर टॉप-एंड HX10 व्हेरिएंटची किंमत अंदाजे ₹14.58 लाखांपर्यंत जाते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोयाबीनच्या दराबद्दल नवी अपडेट, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

 

मराठी बातम्या/ऑटो/
Hyundai ने आणली 'बेबी Creta', फिचर्स आणि किंमत पाहून लगेच कराल बूक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल