TRENDING:

Tesla काहीच नाही! भारतीय कंपनीने लाँच केली जगातली पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा, चालकाची गरजच नाही!

Last Updated:

जगभरात अनेक ठिकाणी अशा ड्रायव्हर लेस टॅक्सी आता पाहायला मिळत आहे. आता भारताने सगळ्यांच्या पुढे एक पाऊल टाकत चक्क ड्रायव्हरलेस रिक्षाची चाचणी यशस्वी करून दाखवली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अमेरिकेची लोकप्रिय टेस्ला कार भारतात आली. टेस्ला कारमध्ये ऑटो ड्रायव्हर फिचर्सने अवघ्या जगाला भुरळ घातली. ड्रायव्हर नसलेली कार तुम्हाला निश्चित ठिकाणी घेऊन जाते. जगभरात अनेक ठिकाणी अशा ड्रायव्हर लेस टॅक्सी आता पाहायला मिळत आहे. आता भारतात सुद्धा असा प्रयोग यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे, भारताने सगळ्यांच्या पुढे एक पाऊल टाकत चक्क ड्रायव्हरलेस रिक्षाची चाचणी यशस्वी करून दाखवली आहे.  ओमेगा सेकी मोबिलिटी (OSM) या कंपनीने जगातली पहिली अशी  ऑटोनॉमस इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर लाँच केली आहे. या रिक्षाला ड्रायव्हरची गरज नाही. रिक्षा आपोआप धावतोय.
News18
News18
advertisement

ओमेगा सेकी मोबिलिटी ही एक दिल्लीतील भारतीय इलेक्ट्रिक उत्पादक कंपनी आहे. या कंपनी ईलेक्ट्रिक  रिक्षा आणि ट्रकची निर्मिती सुरू केली आहे. अशातच या कंपनीने स्वयंगती (Swayamgati) नावाची इलेक्ट्रिक रिक्षा आणली आहे. ही रिक्षा विना चालक चालू शकते. या रिक्षाची चाचणीही यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, रिक्षा जेव्हा चालकाविना धावत असेल आणि अचानक कुणी जर समोर आलं तर ही रिक्षा जागेवरच थांबते.

advertisement

काय आहे फिचर्स? 

स्वयंगतीमध्ये लिडर, GPS, AI-आधारित अडथळा शोधणे (६ मीटरपर्यंत), मल्टी-सेन्सर नेव्हिगेशन आणि रिमोट सेफ्टी कंट्रोल समावेश आहे. ही रिक्षा खास करून विमानतळ, आयटी पार्क, स्मार्ट कॅम्पस, औद्योगिक केंद्रे आणि गर्दीच्या शहरी भागात वापरता येऊ शकते.  भारतीय रस्त्यांचा अभ्यास करून  भारताच्या रहदारी आणि विविध भूप्रदेशासाठी डिझाइन केलेले आहे. या रिक्षाचा वेग हा मर्यादीत आहे. ४५ किमी प्रति तास या वेगाने ही रिक्षा धावते. त्यामुळे  स्मार्ट शहरे, औद्योगिक क्षेत्रं आणि वाहतूक केंद्रांसाठी योग्य आहे. पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्याने, उत्सर्जन आणि कमी ऑपरेशनल खर्च आहे.

advertisement

टेस्ट कशी घेतली? 

या रिक्षची ३ किमीच्या  मार्गावर चाचणी घेण्यात आली होती. ती यशस्वी राहिली. ज्यामध्ये सात थांबे होते, रिअल-टाइम अडथळा शोधणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय सुरक्षित प्रवासी हालचाल समावेश होता. फेज २ नियंत्रित वातावरणात व्यावसायिक रोलआउट सुरू करेल.

advertisement

 किंमत किंती?

प्रवासी प्रकाराची किंमत अंदाजे ४ लाख रुपये आहे, तर लॉजिस्टिक्स/कार्गो  मॉडेल लवकरच लाँच केली जाणार आहे. याची रिक्षाची किंमत अंदाजे ४.१५ लाख इतकी असेल, ही रिक्षा एका चार्जवर १२० किलोमीटरपर्यंतच्या रेंजसह बॅटरीने चालते. त्यात OSM चे इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म आणि AI-आधारित ऑटोनॉमस सिस्टम समाविष्ट आहे.

कंपनीचं ध्येय काय? 

advertisement

"स्वयंगती हे केवळ उत्पादन लाँच नाही; ते भारतीय वाहतुकीच्या भविष्यातील एक मोठं पाऊल आहे. ऑटो पायलट वाहनं आता भविष्याची कल्पना नाहीतर सध्याची गरज आहे. आम्ही दाखवून दिलं आहे की, भारत जागतिक ट्रेंडचे अनुसरण करण्याऐवजी त्यांचे नेतृत्व करू शकतो," असं कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष उदय नारंग यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/ऑटो/
Tesla काहीच नाही! भारतीय कंपनीने लाँच केली जगातली पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा, चालकाची गरजच नाही!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल