दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई मोटर इंडिया आणि किआ इंडियाने आपल्या वाहनांची किंमती कमी केल्याची घोषणा केली आहे. नवीन जीएसटी धोरणामुळे ह्युंदाई आणि किआच्या संपूर्ण आयसीई श्रेणीच्या किमतीत अनुक्रमे २.४० लाख आणि ४.४८ लाख रुपयांपर्यंत मोठी कपात करण्यात आली आहे. नवीन जीएसटी दर २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील.
i20 सीरिजमध्ये किती कमी झाले दर
advertisement
ह्युंदाई निओस, i20 आणि i20 एन लाईन हॅचबॅकच्या किंमती अनुक्रमे ७३,८०८, ९८,०५३ आणि १,०८,११६ रुपयांनी कमी झाल्या आहेत. ऑरा कॉम्पॅक्ट सेडान आणि एक्सटर मायक्रो एसयूव्हीच्या किंमती अनुक्रमे ७८,४६५ आणि ८९,२०९ रुपयांनी कमी झाल्या आहेत. व्हेन्यू आणि व्हेन्यू एन लाईनच्या किंमती अनुक्रमे १,२३,६५९ आणि १,१९,३९० रुपयांनी कमी झाल्या आहेत.
Kia च्या मॉडेलच्या किमतीत किती झाली कपात?
Kia च्या गाड्या | किंमत किती कमी |
Sonnet | Rs 1,64,471 |
cyrus | Rs 1,86,003 |
Seltos | Rs 75,372 |
carens | Rs 48,513 |
carens clavis | Rs 78,674 |
कार्निवाल | Rs 4,48,542 |
तर, जीएसटी बदलांनंतर किआ कार्निवलची किंमत ४,४८,५४२ रुपयांनी मोठी कपात झाली आहे. नवीन किआ सिएरोस आता १,८६,००३ रुपयांनी स्वस्त झाली आहे, तर सोनेट सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही आता १,६४,४७१ रुपयांनी स्वस्त झाली आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या किआ सेल्टोस एसयूव्हीच्या किमतीत ७५,३७२ रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. किआ कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिसच्या किमती अनुक्रमे ४८,५१३ आणि ७८,६७४ रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत.