नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात या इलेक्ट्रिक गोल्फ कार्टचं प्रदर्शन करण्यात आलं होतं. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते. भारतातील इटलीचे राजदूत डॉ. अँटोनियो बार्टोली, कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष डॉ. अरुण फिरोदिया आणि टोनिनो लॅम्बोर्गिनी एसपीएचे संस्थापक डॉ. टोनिनो लॅम्बोर्गिनी यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला अव्वल उद्योगपती आणि अनेक गोल्फ व्यावसायिकांनीही हजेरी लावली.
advertisement
किंमत किंती?
Genesis रेंजची सुरुवात १०,००० अमेरिकन डॉलर्सपासून होते, जी अंदाजे ८.६० लाख रुपये आहे, तर टॉप-एंड व्हेरिएंट प्रेस्टिजची सुरुवात १४,००० अमेरिकन डॉलर्सपासून होते, जी अंदाजे १२ लाख रुपये आहे. टोनिनो लॅम्बोर्गिनी गोल्फ आणि लाइफस्टाइल कार्ट इटालियन डिझाइन आणि भारतीय अभियांत्रिकी एकत्र करून प्रीमियम अनुभव देतात. हे कार्ट २, ४, ६ आणि ८ सीटर कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असतील, जे गोल्फ कोर्स आणि रिसॉर्ट्स ते गेटेड कम्युनिटीज, कॉर्पोरेट कॅम्पस आणि विमानतळांसाठी योग्य असतील.
५ वर्षांची वॉरंटी
हे कार्ट ४५ एनएम इलेक्ट्रिक मोटरद्वारे सज्ज आहेत आणि त्यात मॅकफर्सन सस्पेंशन, फोर-व्हील हायड्रॉलिक ब्रेकिंग आणि १५० किमी पर्यंतची रेंज देणारी प्रगत लिथियम-आयन बॅटरी सिस्टम आहे. बॅटरी वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते, १० वर्षांचे लाइफटाइम आणि ५ वर्षांची वॉरंटीसह येते.