जीएसटी कौन्सिलने या आठवड्याच्या सुरुवातीला कर कपातीला मान्यता दिली. नवीन जीएसटी दर २२ सप्टेंबर २०२५ पासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लागू होतील. परंतु, महिंद्रा यांनी आजपासून ६ सप्टेंबरपासून तात्काळ किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. जीएसटी दर कपातीनंतर, महिंद्राची एसयूव्ही लाइन-अप अधिक परवडणारी बनली आहे, ज्यामुळे खरेदीदार मॉडेलनुसार १.०१ लाख रुपयांपासून ते १.५६ लाख रुपयांपर्यंत बचत करू शकतात.
advertisement
महिंद्राच्या दरात किती झाली कपात
• XUV3XO (डिझेल): कर दर ३१% वरून १८% पर्यंत कमी - १.५६ लाख रुपये
• स्कॉर्पिओ-एन: ४८% (जीएसटी + सेस) ४०% पर्यंत कमी - १.४५ लाख रुपये
• XUV700: ४८% ते ४०% - १.४३ लाख रुपये
• XUV3XO (पेट्रोल): २९% ते १८% - १.४० लाख रुपये
• थार २WD (डिझेल): ३१% ते १८% - १.३५ लाख रुपये
• थार रॉक्स: ४८% ते ४०% - १.३३ लाख रुपये
• बोलेरो / बोलेरो निओ: ३१% ते १८% - ₹ १.२७ लाख
• स्कॉर्पिओ क्लासिक: ४८% ते ४०% — ₹ १.०१ लाख
• थार ४WD (डिझेल): ४८% ते ४०% — ₹ १.०१ लाख
नवीन GST दर
१२०० सीसी पर्यंत इंजिन क्षमता आणि ४००० मिमी पर्यंत लांबी असलेल्या पेट्रोल, CNG आणि LPG कारवर आता १८% GST लागेल, जो पूर्वी २८% होता. १५०० सीसी पर्यंत इंजिन क्षमता आणि ४००० मिमी पर्यंत लांबी असलेल्या डिझेल कारवर आता १८% GST लागेल. १२०० सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमता (पेट्रोल/CNG/LPG) किंवा १५०० सीसी पेक्षा जास्त (डिझेल) किंवा ४००० मिमी पेक्षा जास्त लांबी असलेल्या कारवर आता ४०% GST लागेल, जो पूर्वी सेससह सुमारे ५०% होता.
टाटा मोटर्स आणि रेनॉल्टनेही केली कर कपात
टाटा मोटर्सने शुक्रवारीच नवे दर जाहीर केले आहे. २२ सप्टेंबरपासून प्रवासी वाहनांच्या किमती ६५,००० रुपयांनी ते १.४५ लाख रुपयांनी कमी करतील. मुंबईतील या ऑटो कंपनीने त्यांच्या छोट्या कार टियागोच्या किमती ७५,००० रुपयांनी, टिगोरच्या ८०,००० रुपयांनी आणि अल्ट्रोझच्या किमती १.१० लाख रुपयांनी कमी होतील.
रेनॉल्टच्या कारही स्वस्त झाल्या आहेत.
रेनॉल्ट इंडियाने शनिवारी सांगितले की ते त्यांच्या वाहनांच्या किमती ९६,३९५ रुपयांपर्यंत कमी करतील जेणेकरून अलीकडील जीएसटी दर कपातीचा पूर्ण फायदा त्यांना मिळेल. एंट्री-लेव्हल क्विडच्या किमती ५५,०९५ रुपयांपर्यंत, ट्रायबरच्या ८०,१९५ रुपयांपर्यंत आणि किगरच्या किमती ९६,३९५ रुपयांपर्यंत कमी होतील, असे ऑटोमेकरने सांगितले.