अमेरिका आणि युरोपमध्ये पिक-अप ट्रकचं मोठं मार्केट आहे. ग्रामीण आणि शहरीभागामध्ये पिकअप-ट्रकची चांगली लोकप्रियता आहे. त्यामुळे महिंद्रा पिक-अप ट्रकवर मागील काही वर्षांपासून काम करत आहे. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत पिक-अप कॉन्सेप्ट शोमध्ये महिंद्राने आपल्या पिकअप ट्रकची झलक दाखवली होती. या पिकअप ट्रकचं उत्पादन नाशिकमध्ये केलंय. हा पिकअप ट्रक नव्या स्कॉर्पिओ एनवर आधारित आहे आणि त्यात स्कॉर्पिओ गेटवेसारखे नवीन चौरस-पॅटर्न फ्रंट ग्रिल आणि टेल लॅम्प आहेत. मागील दिवे हॅलोजन आहेत, परंतु उत्पादन-तयार मॉडेलमध्ये एलईडी टेललाइट्स असण्याची अपेक्षा आहे. पिकअप ट्रकमध्ये शार्क अँटेना आणि ओपन बूट स्पेस आहे.
advertisement
सिंगल आणि डबल-केबिन
महिंद्राच्या या पिकअप ट्रकची सध्या चाचणी सुरू आहे, त्याचे फोटो समोर आले आहे, यामध्ये स्कॉर्पिओ एन पिक-अप ट्रक सिंगल आणि डबल-केबिन व्हर्जनमध्ये येईल अशी चिन्ह आहे. चाचणी म्यूल खूप झाकलेला होता आणि हेडलाइट्स स्कॉर्पिओ एन पेक्षा वेगळ्या दिसत होत्या. स्पाय व्हिडिओनुसार, पिक-अप ट्रकचा केबिन थ्रॅक्स रॉक्ससारखा दिसतो. पिक-अप ट्रकच्या टॉप व्हेरिएंटमध्ये ट्विन १०.२५-इंच डिस्प्ले, एक इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी आणि दुसरा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टाइप-सी चार्जिंग पोर्ट, १२ व्ही सॉकेट, मागील पार्किंग सेन्सर्स, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले आणि लॉग लॅम्प्स सारखी फिचर्स दिले आहे.
२ इंजिन ऑप्शन
सुरक्षिततेच्या दृष्टीने, महिंद्राचे पिकअप ट्रक हे इंटरनॅशनल बाजारातले आहे, म्हणून त्यात प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम, एअरबॅग्ज आणि ४-व्हील-ड्राइव्ह सिस्टम असावी. स्कॉर्पिओ एन पिक-अप ट्रक दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. २.०-लिटर पेट्रोल आणि २.२-लिटर डिझेल ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनसह अनेक पॉवर आउटपुटसह उपलब्ध असू शकते आणि पार्ट-टाइम ४WD सिस्टम असू शकते.