Mahindra BE 6 Rally-E ही एखाद्या हॉलिवूड सिनेमात दिसणाऱ्या सुपर कारसारखाच लूक आहे. पहिल्यांदा 2023 महिंद्रा EV फॅशन फेस्टिव्हलमध्ये कन्सेप्ट मॉडेल लाँच केलं होतं. मुळात ही BE 6 चं ऑफ-रोड मॉडेल आहे. या कारमध्ये जोरदार क्लॅडेड फ्रंट बंपर, C-आकाराचे DRL, गोल हेडलाइट्स, मजबूत टायर्स, स्पोर्टी रिअर बंपर आणि C-आकाराचे टेललँप्स दिले आहेत.
advertisement
सध्याच्या फोटोवरून Mahindra BE 6 Rally-E वरच्या बाजूला स्पेअर व्हील आणि छतावर बसवलेले कॅरियर अशा अनेक अॅक्सेसरीज देखील होत्या. महिंद्रा BE 6 रॅली-E चे अधिकृत पॉवरट्रेन तपशील अद्याप उघड झालेले नाहीत. पण, ही एक इलेक्ट्रिक ऑफ-रोडर ड्युअल इलेक्ट्रिक मोटर सेटअप आणि मोठ्या बॅटरी पॅकसह येण्याची शक्यता आहे, जी सुमारे 389 bhp (290 kW) आणि 480 Nm टॉर्क निर्माण करते.
नवीन काय?
महिंद्राने अलीकडेच 3 SUV लाँच केले आहे. थार 3-डोअर, बोलेरो आणि बोलेरो निओ. सर्व मॉडेल्समध्ये कमीत कमी डिझाइन बदल आणि चांगले फीचर अपग्रेड केले आहे. इंजिनमध्ये कोणताही बदल केला नाही. देशांतर्गत ऑटोमेकर २०२६ च्या सुरुवातीला महिंद्रा XUV700 फेसलिफ्ट आणि महिंद्रा XEV 7e देखील लाँच करेल. अपडेटेड XUV700 मध्ये ट्रिपल-स्क्रीन सेटअप (XEV 9e वरून घेतलेला), एक नवीन साउंड सिस्टम आणि पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट ग्रिल आणि हेडलॅम्प असणार आहे.