कंपनीच्या मंडळाने ३१ जुलै २०२५ रोजी झालेल्या बैठकीत या नवीन व्यवसाय योजनांना मान्यता दिली. आता हे बदल कंपनीच्या भागधारकांच्या अंतिम मंजुरीसाठी २८ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) सादर केले जातील.
मारुतीची नवीन सर्व्हिस
ही नवीन व्यवसाय रणनीती मारुती सुझुकीला ईव्ही चार्जिंग, कार भाड्याने देणे आणि वापरलेल्या कारची विक्री यासारख्या नवीन सेवांचा शोध घेण्यास देखील मदत करेल. कंपनी भविष्यातील तंत्रज्ञान आणि नवीन व्यवसायाचा शोध घेण्याचे उद्दिष्ट ठेवते, जे केवळ पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या निर्मितीपुरते मर्यादित नाही. मारुती सुझुकी संशोधन आणि विकास, पुरवठा साखळी सेवा आणि वाहन चाचणीसाठी सुविधा देईल.
advertisement
मारुतीची इलेक्ट्रिक फ्लाइंग कार
मारुतीची उपकंपनी, सुझुकी मोटर कॉर्पोरेशन आणि जपानी स्कायड्राईव्ह यांनी जून २०२३ मध्ये स्कायड्राईव्ह (SD-05 प्रकार) तयार करण्यासाठी करार केला. स्कायड्राईव्ह त्याच्या सुरक्षित, अधिक किफायतशीर आणि शून्य उत्सर्जन गतिशीलता उपायांसाठी प्रसिद्ध आहे. स्कायड्राईव्ह (SD-05 प्रकार) हे पुढील जनरेशनचे eVTOL (इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग) विमान आहे, ज्याला एडव्हान्स्ड एअर मोबिलिटी (AAM) किंवा अर्बन एअर मोबिलिटी (UAM) असंही म्हणतात. हे विमान लहान शहरी मार्गांसाठी डिझाइन केलेलं आहे, जे १५ किमीची रेंज आणि १०० किमी प्रतितास वेग देते.
SD-05 eVTOL विमानाची भारतात एंट्री
स्कायड्राईव्हच्या SD-05 eVTOL विमानाने १० ते १२ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या १० व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट (VGGS) मध्ये भारतात पदार्पण केले. याा परिषदेत विमानाचे १/५ स्केल मॉडेल प्रदर्शित करण्यात आलं. हे मारुती सुझुकीच्या सहकार्याने भारतात एअर टॅक्सी आणि अर्बन एअर मोबिलिटी सोल्यूशन्सच्या लाँचिंगचे देखील शक्यता आहे.