कशी आहे Maruti Escudo?
Maruti Escudo ची चाचणी घेण्यात आली होती, त्यावेळी कारचे काही फोटो व्हायरल झाले होते. या फोटोनुसार ही कार मॉडर्न आणि स्टायलिश आहे. यामध्ये बुमरँग स्टाईल 3D LED टेललॅम्प, मोठे टेलगेट, शार्क फिन अँटिना आणि इंटिग्रेटेड स्पॉइलर दिला आहे. या SUV ची साइज Brezza पेक्षा मोठी आहे आणि Grand Vitara सारखी बरोबरीत आहे. यामध्ये जास्त स्पेस आणि बूट क्षमता दिली आहे.
advertisement
इंजिन कसं आहे?
Maruti Escudo मध्ये पावरट्रेन ऑप्शन मिळण्याची शक्यता असून जे Grand Vitara सारखेच आहे. यामध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन माईल्ड हायब्रिड टेक्नोलॉजी दिली आहे. याशिवाय टोयोटाचं 1.5 लिटर TNGA स्ट्राँग हायब्रिड इंजिन सुद्धा देण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी या SUV चं CNG व्हर्जन सुद्धा लाँच करण्याची शक्यता आहे.
फिचर्स काय असेल?
Maruti Escudo चं इंटिरिअर हे आधुनिक असणार आहे. यामध्ये 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम दिले जाणार आहे. तसंच या एसयूव्हीमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले स्पोर्ट दिलं जाईल. या शिवाय या एसयूव्हीमध्ये स्टँडर्ड 6 एअरबॅग, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस फोन चार्जर आणि मल्टिपल ड्राइव्ह मोड दिले जाणार आहे. या शिवाय फ्लॅट-बॉटम स्टिअरिंग व्हिल आणि ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल सारखे फिचर्स दिले जाणार आहे.
लाँच कधी होणार?
Maruti Escudo चं प्रोडक्शन हे कंपनी आपल्या खरखौदा (हरियाणा) प्लांटमध्ये करणार आहे. अशीही माहिती मिळतेय की, भविष्यात Toyota सुद्धा या SUV वर बेस आपलं नवीन मॉडेल आणण्याची तयारी करत आहे. Maruti Escudo ही भारतात 3 सप्टेंबर 2025 रोजी लाँच होणार आहे.
किंमत किती?
Maruti Escudo ही एक मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये लाँच होणार आहे. या कारचा मुकाबला Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या Popular SUVs शी होणार आहे. किंमतीबद्दल अद्याप कोणतीही घोषणा केली नाही. पण या SUV ची किंमत 10 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. ही एसयूव्ही Grand Vitara पेक्षा स्वस्त असणार आहे आणि Brezza पेक्षा जास्त फिचर्सने लेस असेल.