TRENDING:

Ertiga आता नको, Maruti ने टँकसारख्या Victoris च्या किंमती केल्या जाहीर, इतकी आहे स्वस्त!

Last Updated:

मागील आठवड्यात  Maruti Suzuki Victoris ही एसयूव्ही लाँच केली आहे. या Victoris SUV ला सेफ्टी रेटिंगमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने आता सेफ्टी आणि कमी किंमतीत SUV लाँच करून धमाका केला आहे. मागील आठवड्यात  Maruti Suzuki Victoris ही एसयूव्ही लाँच केली आहे. या Victoris SUV ला सेफ्टी रेटिंगमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. मारुतीने Victoris SUV ची किंमत जाहीर केली नव्हती. पण, आता कंपनीने अखेर किंमती जाहीर केल्या आहे. ही Victoris SUV तुम्ही 10.49 लाखांपासून खरेदी करू शकतात.
News18
News18
advertisement

 मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) ने  अखेरीस Victoris SUV च्या किंमती जाहीर केल्या आहे. 10,49,900 रुपये (एक्स-शोरूम) किंमतीपासून सुरुवात झाली आहे. या कारची विक्री 22 सप्टेंबर  2025 पासून सुरू होणार आहे. Victoris SUV चं टॉप मॉडेल हे जे स्टाँग हायब्रिडसह येतं त्याची किंमत 19 लाख 98 हजार इतकी आहे. 

advertisement

मारूती सुझुकी Victoris SUV किंमत आणि व्हेरियंट(एक्स-शोरूम किंमती, रुपये)
व्हेरियंट/इंधन Lxi Vxi Zxi Zxi (O) Zxi+ Zxi+ (O)
SMART HYBRID 5MT 10 49 900 11 79 900 13 56 900 14 07 900 15 23 900 15 81 900
(PETROL) 6AT 13 35 900 15 12 900 15 63 900 17 18 900 17 76 900
ALLGRIP SELECT (6AT) 18 63 900 19 21 900
STRONG HYBRID e-CVT 16 37 900 17 79 900 18 38 900 19 46 900 19 98 900
S-CNG 11 49 900 12 79 900 14 56 900

advertisement

सेफ्टीमध्ये 5 स्टार रेटिंग

विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी Victoris SUV ला ग्लोबल एनसीएपी Global NCAP (New Car Assessment Program) मध्ये क्रॅश टेस्टमध्येही ५ स्टार रेटिंग मिळाले. Victoris SUV प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेमध्ये पूर्ण 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. जीएनसीएपीच्या नवीन प्रोटोकॉलनुसार या मॉडेलची चाचणी घेण्यात आली. व्हिक्टोरिसमध्ये मानक 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) आणि पादचाऱ्यांची सुरक्षा समावेश आहे, तर ADAS (ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम) पर्याय म्हणून उपलब्ध आहे.

advertisement

प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेमध्ये maruti suzuki victoris ने प्रौढांच्या सुरक्षेमध्ये 34 पैकी 33.72 गुण मिळवले.  या कारमध्ये ड्रायव्हर आणि प्रवाशाच्या डोक्याच्या आणि मानेच्या भागाला चांगले संरक्षण मिळते. ड्रायव्हरच्या छातीला पुरेसं संरक्षण मिळालं, तर प्रवाशाच्या छातीला चांगले संरक्षण मिळाले.

फिचर्स काय?

6 एअर बॅग आणि स्टँड फिचर्स Victoris SUV च्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर या एसयूव्हीमध्ये स्टँडर्ड ६ एअरबॅग देण्यात आल्या आहेत जे की केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. या शिवाय SUV मध्ये ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि 360-डिग्री कॅमेरा असणार आहे.

advertisement

मायलेज किती?

Maruti Suzuki Victoris मायलेज - Maruti Suzuki Victoris मध्ये 1.5-लिटर नॅचरुल एस्पिरेटेड (NA) पेट्रोल इंजिन हे माईल्ड-हायब्रिड टेक आणि 1.5-लिटर स्ट्रॉन्ग हायब्रिड इंजिनचा समावेश आहे. पेट्रोल व्हेरिएंटसह कंपनीने फॅक्टरी फिटेड CNG ऑप्शन दिलं आहे. पेट्रोल व्हेरियंट हे २१ किमी मायलेज देते. Maruti Victoris मध्ये सीएनजीचा ही पर्याय दिला आहे. सीएनजी व्हेरियंटमध्ये २७ किमी मायलेज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. तर Maruti Victoris मध्ये आता माईल्ड आणि स्ट्राँग हायब्रिड दिलं आहे. स्ट्राँग हायब्रिडमध्ये पेट्रोल व्हेरियंटमध्ये ही गाडी तब्बल २८.६५ किमी मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे.

मराठी बातम्या/ऑटो/
Ertiga आता नको, Maruti ने टँकसारख्या Victoris च्या किंमती केल्या जाहीर, इतकी आहे स्वस्त!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल