रेनॉल्ट किगरची ऑन-रोड किंमत किती आहे?
तुम्ही दिल्लीमध्ये त्याचे बेस व्हेरिएंट खरेदी केले तर ऑन-रोड किंमत सुमारे 7.15 लाख रुपये असेल. या रकमेत RTO शुल्क, विमा आणि इतर शुल्क समाविष्ट आहेत. खरंतर, ऑन-रोड किंमत शहर आणि डीलरशिपनुसार बदलू शकते.
दिवाळीपूर्वी गाडी खरेदी करावी की थांबावं? GST कपातीविषयी ग्राहकांमध्ये संभ्रम
advertisement
डाउन पेमेंट आणि EMI कॅलक्युलेशन
तुम्ही नवीन रेनॉल्ट किगर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला त्यासाठी 1 लाख रुपये डाउन पेमेंट द्यावे लागेल. त्यानंतर, उर्वरित रक्कम म्हणजे सुमारे 6.15 लाख रुपये कार कर्जाद्वारे घ्यावे लागतील. समजा तुम्हाला हे कर्ज 5 वर्षांसाठी 9% व्याजदराने मिळाले, तर ईएमआय सुमारे 12,000 ते 13,000 असेल. खरंतर, EMIची अचूक रक्कम तुमच्या बँक, कर्जाच्या कालावधी आणि क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असेल.
इंजिन आणि मायलेज
2025 Renault Kigerमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. पहिले- 1.0L नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, जे सोप्या आणि सुरळीत ड्रायव्हिंगसाठी आहे. दुसरे- 1.0L टर्बो पेट्रोल इंजिन, जे अधिक पॉवर आणि स्पोर्टी परफॉर्मन्स देते. दोन्ही इंजिनमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, नॅचरली एस्पिरेटेड इंजिन सुमारे 19.83 किमी प्रति लिटर मायलेज देण्यास सक्षम आहे आणि टर्बो इंजिन 20.38 kmpl पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे.
तुमचीही कार पावसाच्या तुंबलेल्या पाण्याने डॅमेज झाली का? आधी वाचा या 5 गोष्टी
फीचर्स आणि सेफ्टी
नवीन रेनॉल्ट किगर आता अधिक प्रीमियम आणि प्रगत झाली आहे. त्यात 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जिंग आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारखी फीचर्स आहेत. कंपनीने सुरक्षिततेसाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. आता त्यात 6 एअरबॅग्ज स्टँडर्ड, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), हिल स्टार्ट असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), ISOFIX चाइल्ड सीट अँकर, ABS आणि EBD सारखी फीचर्स आहेत.
