ईलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओलाने पहिल्यांदाच हे डिव्हाईस लाँच केलं आहे. ‘Ola Shakti’ ही एक बॅटरी तयार केली आहे. ही इतर बॅटरीपेक्षा वेगळी आहे. ही बॅटरी तुम्ही चार्ज करून ठेवू शकतात. घरात विज गेल्यावर तुम्हाला Ola Shakti हे एका इनव्हर्टर आणि जनरेटसारखं काम करेल. ही बॅटरी पॉवरफुल आहे. या बॅटरीवर तुम्ही घरातील ए.सी. (AC), फ्रीज, शेतीत पाणी पंपासाठी, किंवा तुमच्या छोट्या व्यवसायात वापरू शकता.
advertisement
काय आहे Ola ShaktiOla Shakti?
ही एक पोर्टेबल बॅटरी सारखं डिव्हाईस आहे, जे घरांमध्ये ए.सी., फ्रीज, पाणी पंप आणि छोटे व्यवसाय यांना वीज पुरवठा करण्यासाठी वापरले जाऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे इन्व्हर्टरपेक्षा खूप मोठे उपकरण आहे, जे एकाच वेळी अनेक उपकरणासाठी वापरू शकतो. इन्व्हर्टरमध्ये फक्त फॅन दिवे आणि टीव्ही वापरता येतेय पण, Ola Shakti मध्ये घरातील सगळे उपकरण वापरता येईल.
Ola Shakti चं किंमत किती?
Ola Shakti 4 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 1.5 kWh, 3 kWh, 5.2 kWh आणि 9.1 kWh असा पर्याय दिला आहे. पहिल्या 10,000 युनिट्सची किंमत अनुक्रमे 29,999 रुपये, 55,999 रुपये, 1,19,999 रुपये आणि 1,59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. याची प्री-बुकिंग 999 रुपयांमध्ये सुरू झाली आहे. डिलिव्हरी जानेवारी मकर संक्रांती 2026 पासून सुरू होईल. सध्या कंपनीने ही ऑफर लाँच म्हणून दिली आहे. जी केवळ पहिल्या 10,000 युनिट्ससाठी लागू असेल.
फिचर्स काय?
Ola Shakti मध्ये इन्स्टंट पॉवर चेंजओव्हर, वेदरप्रूफ, IP67 रेटेड बॅटरी आणि कनेक्टेड ॲपद्वारे रिअल-टाइम मॉनिटरिंगचा समावेश आहे. म्हणजेच, वापरकर्ता आपल्या स्मार्टफोनशी कनेक्ट करून त्यावर सहजपणे लक्ष ठेवू शकतो. Ola Shakti एका वेळी ए.सी., फ्रीज आणि पंपसारख्या उपकरणांना पूर्ण क्षमतेवर सुमारे 1.5 तास वीज पुरवठा करू शकतो.