स्पोर्ट्स स्कूटर सेगमेंटमध्ये एंट्री
S1 Pro Sport हे स्पोर्ट्स स्कूटर सेगमेंटमध्ये ओलाने अधिकृत एंट्री केली आहे. ज्यामध्ये चांगली कामगिरी करणारे असे हार्डवेअर आणि नवीन टेक्नालॉजीचा वापर केला आहे. या स्कूटरची रचना विशेषतः नवीन आहे, ज्यामध्ये कार्बन फायबर फ्रंट मडगार्ड आणि ग्रॅब रेल, एरो विंग्स आणि एक स्कल्प्टेड विंडस्क्रीन दिली आहे. जी एरोडायनामिक्स आणि डाउनफोर्स सुधारते. स्कूप केलेले रायडर सीट आणि उंचावलेले पिलियन सेक्शन त्याला रेसर प्रोफाइल देते, तर कार्बन फायबर डिटेलिंग त्याची प्रीमियम पोझिशनिंग दर्शवते.
advertisement
इन-हाऊस फेराइट मोटर
याचा मुख्य भाग म्हणजे, १६ किलोवॅटची इन-हाऊस विकसित फेराइट मोटर, जी ५.२ किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकसह येते आणि ३२० किमी पर्यंत IDC रेंज देते. S1 प्रो स्पोर्टचा टॉप स्पीड १५२ किमी प्रतितास असल्याचा दावा आहे आणि तो फक्त २.० सेकंदात ०-४० किमी प्रतितास वेग वाढवतो. या कामगिरीला पूरक म्हणून, स्कूटरमध्ये १४-इंच अलॉय व्हील्स, रुंद टायर्स, रिट्यून्ड टेलिस्कोपिक फोर्क्स आणि गॅस-चार्ज केलेले रिअर सस्पेंशन आहे, जे स्थिरता, पकड आणि रायडरचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. रेन, अर्बन आणि ट्रॅक मोडसह ट्रॅक्शन कंट्रोल फीचर ते एक सोपा-टू-राइड पर्याय बनवते.
किंमत आणि डिलिव्हरी
S1 Pro Sport मध्ये अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फ्रंट कोलिजन वॉर्निंग आणि लेन डिपार्चर वॉर्निंग सारख्या ADAS क्षमतांचा समावेश आहे. फ्रंट कॅमेरा राइड रेकॉर्डिंग आणि लाईव्ह व्लॉगिंग देखील देतो. या S1 Pro Sport स्पोर्टची किंमत १,४९,९९९ रुपये (एक्स-शोरूम) या लाँच किमतीत उपलब्ध आहे. प्री-बुकिंग आता सुरू झाली आहे आणि ग्राहकांसाठी डिलिव्हरी जानेवारी २०२६ पासून सुरू होईल.
