ही घटना घडली आहे हरियाणातील कर्नाल येथील जीटी रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री घडलेल्या एका विचित्र घटनेमुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. या पंपावर महिला कर्मचाऱ्याने 70 लीटर क्षमता असलेल्या टाकीत 77 लीटर डिझेल भरल्याची पावती दिली. वाद वाढल्यावर पोलिसांना बोलवावं लागलं. पावतीवर 76 लीटर नमूद केलं होतं, परंतु पोलिसांच्या उपस्थितीत टाकी रिकामी केल्यावर त्यात केवळ 57 लीटर डिझेल निघालं. हे पाहून पंप मालकाने याला मात्र तांत्रिक बिघाड आहे असा ड्रामा केला.
advertisement
बनावट बिलिंगचा खेळ
मध्यरात्री उशिरा कर्नालच्या जीटी रोडवरील पेट्रोल पंपावर एका बीएमडब्ल्यू कारमधील ग्राहक डिझेल भरण्यासाठी थांबला. कर्मचाऱ्याने नोजल टाकलं आणि मीटर सुरू केलं. काही मिनिटांतच पावती देत 77 लीटर डिझेल भरल्याचे सांगण्यात आलं. मात्र, ग्राहकाला संशय आला, कारण त्यांच्या कारच्या टाकीची क्षमता केवळ 70 लीटर आहे. मग का वाद सुरू झाला. ग्राहकाने तत्काळ पंप व्यवस्थापकाला बोलावलं, पण स्पष्टीकरण देण्याऐवजी वाद वाढला. अखेरीस, ग्राहकाने डायल 100 वर कॉल करून पोलिसांना बोलावलं. पोलीस पोहोचताच घटनास्थळी गदारोळ झाला. "माझ्या कारच्या टाकीत जास्तीत जास्त 70 लीटर डिझेल मावतं, मग 76-77 लीटर कसे भरलं? ही सरळसरळ चोरी आहे." असा आरोप BMW कार चालकाने केला.
पोलिसांनी BMW ची टाकी केली खाली
पोलिसांनी तात्काळ BMW कारची टाकी रिकामी करण्याचा आदेश दिला. नोजलद्वारे डिझेल बाहेर काढून मोजले असता, आश्चर्यकारकरित्या केवळ 57 लीटर डिझेल निघालं. म्हणजेच, 19 लीटरचा फरक आढळून आला. पंपावर हा फसवणुकीचा डाव समोर आला.
14 लीटरचा घोटाळा
विशेष म्हणजे, BMW कारमालक जेव्हा पंपावर पोहोचला तेव्हा कारच्या टाकीत आधीच सुमारे 5 लीटर डिझेल होतं. या हिशोबाने एकूण 62 लीटरपेक्षा जास्त डिझेल नसायला हवं होतं. पण पावतीवर 76 लीटर लिहिलं होतं. म्हणजे, कमीतकमी 14 लीटरचा घोटाळा झाला आहे. पंपचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, मीटरचे कॅलिब्रेशन तपासावे आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकाने केली. अशा पंपांवर ग्राहकांची लूट होत आहे. सरकारने त्वरित पाऊल उचलावी, अशी मागणी BMW कारचालकाने केली.
पंप मालक नरमला
दरम्यान, पेट्रोल पंप व्यवस्थापनाने स्वतःला निर्दोष ठरवत स्पष्टीकरण दिलं. टाकीत अजून पुरेसे तेल बाकी आहे. जोपर्यंत ती पूर्णपणे रिकामी होत नाही, तोपर्यंत योग्य निष्कर्ष येणार नाही. ही तांत्रिक बिघाड किंवा गैरसमज असू शकतो. पंप मालकाने फ्लो मीटर आणि सीसीटीव्ही तपासणार असल्याचं सांगितलं. "आमच्या पंपावर असा कोणताही गैरव्यवहार होत नाही. कदाचित नोजलमध्ये गळती किंवा मापन त्रुटी झाली असेल. ग्राहकाला पूर्ण पैसे परत करण्यास आम्ही तयार आहोत, पण तपास पूर्ण होऊ द्या." असं म्हणत पंपमालकाने माघार घेतली.
पोलिसांनी दिले कारवाईचे संकेत
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली आहे. "तक्रार मिळाल्यावर आम्ही प्राथमिक तपास केला. जर औपचारिक तक्रार दाखल झाली, तर वजन व मापे विभागाला सूचित करून मीटरचे कॅलिब्रेशन आणि रेकॉर्ड तपासले जातील. दोषी आढळल्यास परवाना रद्द करण्यासह सख्त कारवाई केली जाईल." असं पोलिसांनी स्पष्ट केलं.