TRENDING:

PUC असेल तरच मिळेल पेट्रोल, झटपट पीयूसी प्रमाणपत्र कसं काढायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस!

Last Updated:

एवढंच नाहीतर परिवहन विभागाकडून धडक मोहिम सुद्धा राबवली जाणार आहे. त्यामुळे PUC काढणे आता गरजेचं आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रदुषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. जर वाहनांचं पीयूसी (PUC) अर्थात प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसेल तर पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही, असे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. एवढंच नाहीतर परिवहन विभागाकडून धडक मोहिम सुद्धा राबवली जाणार आहे. त्यामुळे PUC काढणे आता गरजेचं आहे.
News18
News18
advertisement

जर तुमच्या दुचाकी आणि चारचाकी गाडीचं PUC अजून काढलं नसेल तर लगेच काढावं लागणार आहे.  महाराष्ट्रामध्ये पीयूसी (Pollution Under Control) प्रमाणपत्र काढायचं असेल तर तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीचा वापर करू शकतात.

PUC व्हॅन गाठा!

तुमच्या शहरामध्ये पेट्रोल पंपाशेजारी नेहमी PUC काढून देणारी व्हॅन उभी असते. त्यामुळे  पेट्रोल पंप किंवा महामार्गावर उभ्या असलेल्या या अधिकृत PUC सेंटरमध्ये जाऊन तुम्ही PUC काढू शकतात.  तिथे गेल्यावर  तुमच्या दुचाकी, चारचाकी वाहनाची तपासणी करू शकता.

advertisement

अशी होती PUC सेंटरमध्ये चाचणी

या PUC सेंटरवर ऑपरेटर तुमच्या वाहनाच्या एक्झॉस्ट पाईपमध्ये एक उपकरण (गॅस ऍनालाइजर) टाकेल. त्यानंतर तुमच्या वाहनाचं उत्सर्जन तपासलं जाईल. पेट्रोल वाहनांसाठी CO (कार्बन मोनोऑक्साइड) आणि HC (हायड्रोकार्बन) तपासलं जातं, तर डिझेल वाहनांसाठी धुराची घनता (स्मोक डेन्सिटी) तपासली जाते.  जर तुमच्या वाहनाचे उत्सर्जन निर्धारित मर्यादेत असेल, तर तुम्हाला लगेच PUC प्रमाणपत्र मिळेल.

advertisement

किती लागते फी?

पेट्रोल पंपावर आणि रस्त्यावर असलेल्या PUC सेंटरमध्ये तपासणीसाठी शुल्क आकारले जाते, मुळात हे वाहनाच्या प्रकारवर अवलंबून आहे.  साधारपणे 60 ते 100 रुपये फी आकारली जाते.

PUC प्रमाणपत्र ऑनलाईन डाऊनलोड करा

मुळात PUC सेंटरवर जाऊन वाहनाची तपासणी केल्यानंतर प्रमाणपत्र मिळतं. एकदा तपासणी झाल्यावर PUC प्रमाणपत्र हे तुम्ही ते ऑनलाइन डाउनलोड करू शकता. परिवहन पोर्टल हे  परिवहन विभागाची ही अधिकृत वेबसाइट आहे. तिथे गेल्यावर  'PUC Certificate' वर क्लिक करायंच.  होम पेजवर 'ऑनलाइन सर्विसेस' पर्यायामध्ये 'PUC Certificate' वर क्लिक करा. त्यानंतर,

advertisement

तुमचा वाहन नोंदणी क्रमांक (Vehicle Registration Number) टाका.

तुमच्या चेसिस क्रमांकाचे (Chassis Number) शेवटचे पाच अंक टाका.

स्क्रीनवर दिसणारा 'कॅप्चा कोड' भरा.

'PUC Details' वर क्लिक करा: माहिती भरल्यानंतर 'PUC Details' वर क्लिक करा. जर तुमच्या वाहनाकडे वैध PUC प्रमाणपत्र असेल, तर तुम्ही ते पाहू शकता आणि प्रिंट किंवा डाउनलोड करू शकता.

advertisement

PUC प्रमाणपत्राची वैध्यता किती?

नवीन वाहनासाठी (BS-IV आणि BS-VI) पहिले PUC प्रमाणपत्र १ वर्षासाठी वैध असते. त्यानंतर, प्रत्येक प्रमाणपत्राची वैधता ६ महिन्यांसाठी असते. वाहनाच्या प्रकारानुसार आणि वापरल्या जाणाऱ्या इंधनानुसार (पेट्रोल, डिझेल, CNG/LPG) तपासणी शुल्क बदलते.

कोणती कागदपत्र लागतील?

वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate - RC) बूक इत्यादी कागदपत्र लागतील.

मराठी बातम्या/ऑटो/
PUC असेल तरच मिळेल पेट्रोल, झटपट पीयूसी प्रमाणपत्र कसं काढायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल