पोलिश रॅली ड्राइव्हर मिको मार्जिक असं या पठ्याचं नाव आहे. मिको मार्जिक हा 2025 युरोपीय रॅली चॅम्पियनशिपचा विजेता आहे. त्याने हा पराक्रम आपल्या स्कोडा सुपर्ब (Skoda Superb) कारद्वारे केला आहे. मिको मार्जिकने Skoda Superb ची टाकी फुल केली. ही Skoda Superb एक डिझेल कार आहे. त्याने कारची टाकी फुल केली आणि सलग चालवली. एकदा फुल केलेल्या टाकीने तब्बल 2,831 किमी अंतर त्याने पार केलं. जगात ही दुसरी कार आहे, ज्याने हा भीम पराक्रम केला आहे. मिकोचा हा पराक्रम आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला आहे. मिकोनं एकदाचा कारची डिझेल टाकी फुल करून सर्वात दूर अंतर पार केलं. आता तुम्ही विचार करत असाल तर त्याने कारमध्ये काही बदल केला असेल पण त्याने असं काहीच केलं नाही. त्याचा हा पराक्रम पाहून सगळेच हैराण झाले आहे.
advertisement
20,000 किमीआधीच रनिंग होतं कारचं!
विशेष म्हणजे, मिकोनं हा पराक्रम करण्यासाठी Skoda Superb कारची निवड केली. या कारचं रनिंग आधीच 20,000 किलोमीटर झालं होतं. या प्रवासासाठी मिकोनं कारमध्ये काहीच बदल केला नाही. कार जशी होती तशीच वापरली. या कारमध्ये स्टॉकमध्ये 66L फ्यूल टँक सुद्धा ठेवला होता. फक्त कारमध्ये 16-इंचाचे अलॉय व्हिलवर लो-रेसिस्टेंस टायर आणि स्पोर्टलाइन व्हेरिएंटमध्ये सस्पेंशन स्प्रिंग्स वापरले ज्यामुळे ग्राउंड क्लिअरेंस 15 मिमी कमी झालं.
कुठून कुठे केला प्रवास?
मिकोनं पोलँड ते जर्मनी आणि फ्रांस असा प्रवास केला. पुढे नेदरलँड, बेल्जियम आणि जर्मनी असा प्रवास केला. या प्रवासात बाहेर वातावरण हे थंड होतं. कधी कधी तर तापमान हे उणे 1 डिग्री सेल्सियस पर्यंत गाठत होतं. मिकोनं या प्रवास Skoda Superb मध्ये 66L फ्यूल टँक फुल केला होता, यामध्ये साधचं डिझेल वापरलं होतं. यात कोणतंही प्रीमियम डिझेल वापरलं नाही. 66 लिटर टँकमध्ये Skoda Superb ने 2,831 किमी अंतर पार केलं. या अंतरामध्ये Skoda Superb ने 42.89 किमी/लिटर मायलेज दिलं.
80 किमी स्पीड
मिकोनं संपूर्ण प्रवासात कार ही 80 किमी प्रति कास वेगाने चालवली. यापेक्षा त्याने स्पीड लिमिट क्रॉस केली नाही. Skoda Superb कारची टाकी ही पूर्ण क्षमतेनं भरली तर आणखी जास्त मायलेज देऊ शकते. मी नियमित मिळणारं डिझेल वापरलं होतं. जर प्रीमियम डिझेल वापरलं तर फुट टाकीमध्ये 3,000 किमी प्रवास करू शकतो, असा दावा मिकोनं केला आहे.
