राजदूत मोटरसायकल ही भारतातील एक प्रतिष्ठित मोटरसायकल होती. हा ब्रँड विविध कारणांनी हिंदुस्थानात लोकप्रिय होता. राजदूत मोटरसायकल्स दणकटपणा आणि टिकाऊपणासाठी अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय होत्या. विशेषत: ग्रामीण भागांतील रस्त्यांवर ती सत्ताच गाजवायची.
इतिहास
हरप्रसाद नंदा यांनी 1948 मध्ये एस्कॉर्ट्स लिमिटेड कंपनीची स्थापना केली होती. 1960 में एस्कॉर्ट्स ने जर्मन कंपनी फोर्ड राइनशी करार करून 1962 मध्ये राजदूत ही पहिली मोटरसायकल भारतीय रस्त्यांवर लाँच केली होती. ही बाईक फोर्ड राइन Taunus 175 या बाईकचं भारतीय रूप होतं.
advertisement
राजदूत 175 भारतीय बाजारात खूप वेगाने लोकप्रिय झाली होती. दणकटपणा, मायलेज आणि परवडणारी किंमत यामुळे ही बाईक सामान्य भारतीयाची लाडकी झाली. राजदूतने 1970 च्या दशकात भारतीय मोटरसायकल बाजारापेठेचा 60 टक्क्यांहून अधिक भाग व्यापला होता. राजदूत 175, 250, 350 आणि 500cc सहित अनेक मॉडल्स तेंव्हा आली होती. राजदूत मोटरसायकल्स पोलीस, संरक्षण दलं आणि सरकारी विभागांतील अधिकारी करायचे.
ही होती मॉडेल्स
राजदूत 175 सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल होतं जे 1962 ते 1985 पर्यंत कंपनी तयार करत होती. राजदूत 250 हे अधिक शक्तिशाली मॉडेल कंपनीने 1970 च्या दशकात बाजारपेठेत उतरवलं होतं. राजदूत 350 हे मॉडेल 1983 मध्ये ग्राहकांच्या सेवेत रुजू झालं हे त्यावेळचं एक स्पोर्टी मॉडेल होतं. या मॉडेलला तेंव्हा ‘ब्लॅक विडो’ असं टोपणनावही मिळालं होतं. कंपनीने 1985 मध्ये राजदूत 500 हे सगळ्यात शक्तीशाली मॉडेल बाजारात आणलं होतं. राजदूत 350 ही भारतात तयार झालेली पहिली डिस्क ब्रेक असणारी मोटरसायकल होती.
अस्ताला सुरूवात
जपानी बाईक उत्पादकांनी भारतीय बाजारपेठेत 1980 च्या दशकात प्रवेश केला. जपानी बाईक्स अत्याधुनिक, स्टायलिश आणि अधिक मायलेज देणाऱ्या होत्या. त्यामुळे हळूहळू नव्या पिढीला या बाईक्स आवडू लागल्या आणि राजदूतची विक्री कमी होऊन 1990 च्या दशकात कंपनीने राजदूत बाईकचं उत्पादन बंद केलं. 2005 मध्ये एस्कॉर्ट्सने मोटरसायकल व्यवसायातूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता राजदूत पुन्हा रस्त्यांवर धावण्याची शक्यता खूपच धूसर आहे.
त्या काळात चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये राजदूत बाईक्स वापरल्या जायच्या. या बाईकला 2 स्ट्रोक इंजिन असायचं, जे शक्तीशाली आणि मायलेज देणारं असायचं. पण त्यामुळे प्रदूषण व्हायचं. या बाईकला इलेक्ट्रिक स्टार्ट सोय नव्हती त्यामुळे पायांनी ढकलून गाडी पुढे नेली की ती सुरू व्हायची. बाईकला 4-स्पीड गिअरबॉक्स आणि सिंगल-बीम हेडलाईट, सिंगल-बीम टेललाईट आणि सिंगल-सीट किंवा डबल-सीट असायचं. अशा वैशिष्ट्यांनी या बाईक्स सुसज्ज होत्या. आताच्या बाईक्सच्या तुलनेत राजदूत बाइकमध्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स नव्हते,त्यामुळे त्यांची निगा राखणं कठीण जायचं.
जरी ही बाईक आज तयार होत नसली तरीही जुनी राजदूत बाईक रस्त्यावरून धावत असेल तर आजची तरुणाईही मागे वळून त्या बाईककडे पाहत राहते. एकेकाळी रस्त्यांवर सत्ता गाजवलेली बाईक आत्ता दिसत नसली तरीही उत्पादन बंद झाल्यानंतर 34 वर्षांनीही बाईकप्रेमींच्या मनांतलं मात्र राजदूतचं स्थान अढळ आहे.
