पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेला स्फोटामुळे देशभरात खळबळ उडाली आहेय हा स्फोट एका हुंदईच्या I20 कारमध्ये झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पार्किंगच्या परिसरात ही कार उभी होती. संध्याकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास स्फोट झाला.
हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, आजूबाजूचा परिसर स्फोटानं हादरला. घटनास्थळी I20 कारजवळ उभ्या असलेली कार, रिक्षा आणि दुचाकींना आग लागली. या स्फोटामध्ये काही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. या स्फोटानंतर गाड्यांना आग लागली. घटनेती माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू केलं आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक पथक तपास करत असून, स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. सुरक्षा यंत्रणांनी परिसर सील केला आहे आणि सर्व बाजूने तपास सुरू आहे.
(सविस्तर बातमी लवकरच )
