नवी Renault Kiger मध्ये मागील मॉडलच्या तुलनेत आणखी आकर्षक आहे. यामध्ये नवीन स्लिमर ग्रिल आणि नवीन डिझाइन दिलं आहे ज्यात DRLs दिलं आहे. एसयूव्हीच्या समोरील भागात सेंटरमध्ये कंपनीचा लोगो आहे. हेडलॅम्प आणि बंपर डिझाइन सुद्धा बदललं आहे. ज्यामध्ये खाली फॉग लॅम्प दिला आहे. कारला बाजूने पाहिलं तर जुन्या एसयूव्ही सारखीच आहे. पण कारमध्ये आता 16-इंचाचे नवे अलॉय व्हिल्स आणि नवीन ग्रीन पेंट ऑप्शन दिला आहे.
advertisement
इंटिरिअर कसं आहे?
Renault kiger facelift या SUV च्या आतमध्ये कोणतेही फार मोठे बदल केले नाही. आता नवीनन डॅशबोर्ड हा ब्लॅक आणि लाइट ग्रे ड्यूल-टोन कलरमध्ये दिला आहे. सोबतच 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर दिलं आहे. Kiger मध्ये आता 405 लिटर इतका बूट स्पेस आणि दुसऱ्या रो मध्ये 222 mm इतकी जागा मिळेल अशी व्यवस्था केली आहे.
फिचर्स आणि सेफ्टी
नवीन Renault Kiger मध्ये फिचर्स चांगले दिले आहे. व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 360-डिग्री कॅमेरा, ऑटो हेडलाइट्स आमि वायपर्स, वायरलेस चार्जर सारखे फिचर्स दिले आहे. सेफ्टीसाठी या SUV मध्ये आता 6 एअरबॅग्स (स्टँडर्ड), ESP, टायर प्रेशर मॉनिटर, हिल स्टार्ट असिस्ट सारखे फिचर्स दिले आहेत. कंपनीने या फिचर्सला चार व्हेरिएंट्स – Authentic, Evolution, Techno आणि Emotion मध्ये वर्ग केलं आहे.
इंजिन कसं आहे?
Renault kiger facelift मध्ये आता दोन इंजिन पर्याय दिला आहे. 1.0-लीटर नॅचरुल एस्पिरेटेड इंजन (72 hp) आणि 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन (100 hp) दिलं आहे. दोन्ही इंजिनमध्ये 5-स्पीड मॅनुअल गियरबॉक्स दिला आहे. तर नेहमीच्या एस्पिरेटेड इंजनमध्ये AMT गियरबॉक्सचा पर्याय दिला आहे. तर टर्बो इंजिनमध्ये CVT ऑटोमॅटिकसह येईल.
