350cc इंजिन असलेल्या बाइक्सना GST 2.0 अंतर्गत करातून सूट देण्यात आली आहे. नवीन कर दर 22 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, अनेक 350cc बाइक्सवरील प्रभावी कर भार कमी झाला आहे, म्हणून उत्पादकांनी त्यांच्या मॉडेल्सच्या किमती अपडेट केल्या आहेत.
hunter 350 व्हेरिएंट | नवी किंमत |
फॅक्टरी ब्लॅक | Rs 1,37,640 |
ग्रेफाइट ग्रे | Rs 1,62,292 |
डॅपर ग्रे | Rs 1,62,292 |
रिओ व्हाइट | Rs 1,62,292 |
टोकियो | Rs 1,66,883 |
लंडन रेड | Rs 1,66,883 |
रिबेल ब्लू | Rs 1,66,883 |
advertisement
7 कलर ऑप्शन
royal enfield hunter 350 मध्ये आता 7 रंगाचा पर्याय देण्यात आला आहे. नवीन ग्रेफाइट ग्रे टँकभोवती गडद छटासह वेगळा दिसतो, तर काळा मडगार्ड आणि हेडलाइट काऊल आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, रॉयल एनफील्डने हंटर लाइनअपमध्ये रिओ व्हाइट, टोकियो ब्लॅक आणि लंडन रेडसह ३ नवीन रंग पर्याय दिले होते.
इंजिन आणि पॉवर
रॉयल एनफील्ड हंटरमध्ये 349cc, एअर/ऑइल-कूल्ड इंजिन आहे जे 20.2 bhp आणि 27 Nm पीक टॉर्क जनरेट करते. 5-स्पीड गिअरबॉक्सद्वारे मागील चाकाला पॉवर पाठवला जातो, जो आता स्लिप आणि असिस्ट क्लचसह येतो. दिल्लीमध्ये या बाईकची सुरुवातीची किंमत 1,37,640 लाख रुपये आहे.