TRENDING:

Suzuki Avenis 125: सुझुकीने केला आणखी एक बदल, आणली नवीन स्कुटर, कलर आणि किंमत...

Last Updated:

जपानी दुचाकी उत्पादक कंपनी सुझुकी मोटर्सने भारतात एकापेक्षा एक दुचाकी लाँच करून मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जपानी दुचाकी उत्पादक कंपनी सुझुकी मोटर्सने भारतात एकापेक्षा एक दुचाकी लाँच करून मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. मागील काही दिवसांमध्ये सुझुकीने दुचाकी सेगमेंटमध्ये  १२५ सीसी प्रकारात ३ स्कूटर लाँच केल्या होत्या. यामध्ये अ‍ॅक्सेस (Access), बर्गमन स्ट्रीट (, Burgman Street) आणि अ‍ॅवेन्सिस ( Avenis). Access ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी १२५ सीसी स्कूटर असली तरी, इतर दोन मॉडेल्स तितकी लोकप्रिय नाहीत. तरीही, सुझुकीने अ‍ॅवेन्सिसमध्ये एक किरकोळ बदल करून नव्याने लाँच केली आहे. आता Avenis ही १२५ सीसी स्कूटर रेंजमध्ये स्पोर्टी लूक आणि  नव्या रंगासह लाँच करण्यात आली आहे.
News18
News18
advertisement

Suzuki Avenis 125  आता नवीन मेटॅलिक मॅट प्लॅटिनम सिल्व्हर नंबर २ आणि ग्लास स्पार्कल ब्लॅक रंगामध्ये उपलब्ध असणार आहे.  Suzuki Avenis 125 चा हा शेड सध्याच्या कलर ऑप्शनमध्ये सामील झाला आहे. ज्यामध्ये पर्ल ग्लेशियर व्हाइटसह ग्लॉसी स्पार्कल ब्लॅक, पर्ल मीरा रेडसह ग्लॉसी स्पार्कल ब्लॅक आणि ग्लॉसी स्पार्कल ब्लॅक यांचा समावेश आहे.

advertisement

इंजिन तेच!

Suzuki Avenis 125 मध्ये कलर ऑप्शन व्यतिरिक्त फार असे कोणतेही बदल केले नाही. Suzuki Avenis 125  मध्ये १२४.३ सीसी, एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे जे BS6 OBD-2B मानकांचे पालन करते. हे इंजिन ६७५० आरपीएमवर ८.७ एचपी आणि ५५०० आरपीएमवर १० एनएमचा पीक टॉर्क जनरेट करतो.  १२५ सीसी इंजिन सुझुकी इको परफॉर्मन्स (एसईपी) तंत्रज्ञानासह येते जे चांगले परफॉर्मन्ससाठी ओळखले जाते.

advertisement

किंमत किती?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

Suzuki Avenis 125  मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, कम्बाइंड ब्रेक सिस्टम (सीबीएस) आणि १२-इंच फ्रंट व्हील आहे. फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर, Suzuki Avenis 125  मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, यूएसबी सॉकेटसह फ्रंट ग्लोव्ह बॉक्स, बाह्य हिंग-प्रकार इंधन कॅप, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, एलईडी हेडलॅम्प आणि टेललॅम्प, एजी ग्राफिक्स, २१.८-लिटर मोठे अंडर-सीट स्टोरेज आणि साइड स्टँड इंटरलॉक सिस्टम आहे. Suzuki Avenis 125  दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: स्टँडर्ड आणि राइड कनेक्ट. स्टँडर्डची किंमत ९१,४०० रुपये आहे तर राइड कनेक्टची किंमत ९३,२०० रुपये आहे (दोन्ही एक्स-शोरूम).

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
Suzuki Avenis 125: सुझुकीने केला आणखी एक बदल, आणली नवीन स्कुटर, कलर आणि किंमत...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल