चांगली गोष्ट म्हणजे ती खरेदी करण्यासाठी तुम्हाला एकाच वेळी संपूर्ण रक्कम द्यावी लागत नाही. ग्राहक फक्त 50 हजार रुपयांचे डाउन पेमेंट देऊन त्यासाठी फायनेन्स करू शकतात. दिल्लीमध्ये टाटा टियागोच्या बेस XE (पेट्रोल) मॉडेलची ऑन-रोड किंमत सुमारे 5.56 लाख रुपये आहे. या किमतीत 27,371रुपयांचा आरटीओ शुल्क आणि 28,421 रुपयांचा विमा समाविष्ट आहे.
advertisement
'या' आहेत भारतातील सर्वात स्वस्त 5 डिझेल कार! लांबच्या प्रवासात मिळतं भारी मायलेज
टाटा टियागो तुम्हाला किती डाउन पेमेंटमध्ये मिळेल?
जर तुम्ही 50,000 रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला सुमारे 5 लाख रुपयांचे कार लोन घ्यावे लागेल. समजा तुम्हाला बँकेकडून 9% व्याजदराने 5 वर्षांसाठी कर्ज मिळाले तर तुमचा EMI दरमहा सुमारे 11,000 रुपये असेल. जर तुम्ही हे कर्ज 7 वर्षांसाठी घेतले तर EMI सुमारे 8,500 रुपये येईल.
तुमचा मासिक पगार 30,000 ते 40,000 रुपयांच्या दरम्यान असेल तर 7 वर्षांचा EMI प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. 5 वर्षांच्या EMI प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 1.40 लाख रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील. त्यानुसार, कारची एकूण किंमत सुमारे 7 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल. टाटा टियागोची ऑन-रोड किंमत आणि फायनान्स प्लॅन तुमच्या शहर आणि डीलरशिपनुसार बदलू शकते. चांगल्या माहितीसाठी जवळच्या टाटा शोरूमशी संपर्क साधा.
आता ड्रायव्हिंग लायसेन्स थेट मोबाईल नंबरसह आधारशी होणार लिंक! असं करा अपडेट
Tata Tiago CNG इंजिन
टाटा टियागोमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे. तसेच सीएनजी व्हर्जन देखील उपलब्ध आहे. ही कार 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्हीमध्ये येते. पेट्रोल व्हर्जनमध्ये तिचे मायलेज 20.09 किलोमीटर प्रति लिटर आहे, तर सीएनजी व्हर्जनमध्ये मायलेज 28 किलोमीटर प्रति किलोग्रॅम आहे.
