TRENDING:

Thar येईल आता दारात, Mahindra नेही किंमती केल्या कमी; 2.56 लाखांनी SUV झाल्या स्वस्त

Last Updated:

महिंद्राची ही घोषणा ग्राहकांसाठी डबल फायदेशीर ठरणार आहे. जीएसटी सुधारणांमुळे एक्स-शोरूम वाहनांच्या किमती कमी झाल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
केंद्र सरकारने जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल केला आहे. त्यामुळे आता २८ टक्के जीएसटी कर आकारला जाणार नाही. येत्या २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी कर प्रणाली लागू होणार आहे. या निर्णयामुळे सर्वच क्षेत्रात पडसाद उमटले आहे. भारतातील वाहन उत्पादक कंपनी महिंद्र अँड महिंद्राने ( Mahindra & Mahindra) सुद्धा जीएसटी २.० नुसार आपल्या वाहनांच्या किंमती जाहीर केल्या आहेत.  संपूर्ण आयसीई (अंतर्गत ज्वलन इंजिन) SUV लाइनअपच्या एक्स-शोरूम किमती कमी केल्या आहेत.
advertisement

महिंद्राने केवळ ग्राहकांना जीएसटी कपात दिली नाही तर बोलेरो, बोलेरो निओ, एक्सयूव्ही३एक्सओ, थार, थार रॉक्स, स्कॉर्पिओ क्लासिक, स्कॉर्पिओ-एन आणि SUV 700 सारख्या फेमस मॉडेल्सवर अतिरिक्त सवलती देखील दिल्या आहेत. एकूणच, या महिंद्राची वाहनं १.५३ लाख ते २.५६ लाख स्वस्त झाली आहेत. बोलेरो निओच्या किंमतीत मोठी कपात झाली आहे.

जीएसटी कपातीचा संपूर्ण फायदा थेट ग्राहकांना मिळणार आहे.. परिणामी, वाहनांच्या एक्स-शोरूम किमती १,००,००० ने कमी होऊन १.५० लाख झाल्या आहेत. महिंद्राची ही घोषणा ग्राहकांसाठी डबल फायदेशीर ठरणार आहे. जीएसटी सुधारणांमुळे एक्स-शोरूम वाहनांच्या किमती कमी झाल्या आहेत, तर कंपनीने अतिरिक्त फायदे देऊन ही बचत आणखी वाढवली आहे. त्यामुळे, महिंद्रा एसयूव्ही खरेदी करणं आता पूर्वीपेक्षा जास्त सोप्प झालं आहे.

advertisement

कोणत्या गाड्यांच्या किंमती झाल्या कमी? 

मॉडल नवी एक्स-शोरूम सुरुवाती किंमत एक्स-शोरूम जीएसटी किंमतीत कपात अतिरिक्त सवलत एकूण लाभ
बोलेरो/नियो  8.79 लाख  1.27 लाख  1.29 लाख  2.56 लाख
एक्सयूवी 3XO  7.28 लाख  1.56 लाख 90,000 2.46 लाख
Thar 10.32 लाख 1.35 लाख 20,000 1.55 लाख
Thar रॉक्स 12.25 लाख 1.33 लाख 20,000 1.53 लाख
स्कॉर्पिओ क्लासिक  12.98 लाख 1.01 लाख  95,000 1.96 लाख
स्कॉर्पिओ-N  13.20 लाख 1.45 लाख  71,000  2.16 लाख
एक्सयूवी 700  13.19 लाख 1.43 लाख  81,000  2.24 लाख

advertisement

बोलेरो आणि बोलेरो निओ या SUV वर सर्वात जास्त ऑफर देण्यात आली आहे, जीएसटी किंमत कपात आणि अतिरिक्त फायदे जोडल्यानंतर एकूण फायदा २.५६ लाख रुपयांपर्यंत पोहोचेल. XUV3XO खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २.४६ लाख रुपयांपर्यंत बचत देखील मिळणार आहे.

थार आणि थार रॉक्स सारख्या लोकप्रिय मॉडेल्सनाही एकूण १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त फायदे मिळतील. या सणासुदीच्या हंगामात स्कॉर्पिओ क्लासिक आणि स्कॉर्पिओ-एन सारख्या विश्वसनीय मॉडेल्सच्या खरेदीदारांसाठी एक खास भेट आहे. ग्राहकांना स्कॉर्पिओ क्लासिकवर अंदाजे २ लाखांची सूट मिळेल, तर स्कॉर्पिओ-एन खरेदी करणाऱ्यांना २.१६ लाखांपर्यंत बचत करता येईल. XUV७०० सारख्या प्रीमियम SUV वरील एकूण फायदा २.२४ लाखांपर्यंत आहे.

advertisement

विक्री वाढणार!

सणासुदीच्या काळात, जेव्हा लोक त्यांच्या घरांसाठी नवीन वाहनं खरेदी करण्याचा विचार करत असतात, तेव्हा अशी मोठी घोषणा ग्राहकांसाठी बोनसपेक्षा कमी नाही. ही किंमत कपात आणि अतिरिक्त फायदे ग्राहकांचे बजेट हलके करतीलच, शिवाय त्यांना पैशाचे चांगले मूल्य देखील देतील. कंपनीला आशा आहे की, या सवलतींमुळे विक्री वाढेल.

मराठी बातम्या/ऑटो/
Thar येईल आता दारात, Mahindra नेही किंमती केल्या कमी; 2.56 लाखांनी SUV झाल्या स्वस्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल