Honda Activa किती होणार स्वस्त
Honda Activa ही भारतीय मार्केटमधील बेस्ट-सेलिंग स्कूटर आहे. ही आपल्या कमी मेंटेनेंस कॉस्ट आणि हाय रिसेल व्हॅल्यूसाठी लोकप्रिय आहे. Honda Activaची सध्याची एक्स-शोरूम किंमत 81,045 रुपये आहे. GST कपातीनंतर, तिची किंमत जवळपास 73,171 रुपये होऊ शकते.
TVS Jupiter 110 आता 70 हजारांमध्ये
दुसरीकडे, TVS Jupiter 110 ची एक्स-शोरूम किंमत 77 हजार रुपये आहे. GST 2.0 लागू झाल्यानंतर ही किंमत 70 हजार रुपये होण्याची शक्यता आहे. या स्कुटरमध्ये 113.3cc, एअर-कूल्ड, इंजिन आहे, जे 7.91 PS पॉवर आणि 9.8 Nm टॉर्क जनरेट करते.
advertisement
भारतात विकल्या जाणाऱ्या बहुतेक टू-व्हीलर्स 350cc पेक्षा कमी क्षमतेच्या इंजिनसह येतात. सरकारने याच सेगमेंटला लक्षात घेऊन GST दर कमी केला आहे. याचा अर्थ, Honda Activa आणि TVS Jupiter सारख्या देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टू-व्हीलर्स आता पूर्वीपेक्षा खूप स्वस्त होतील. GST कपातीचा हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा देश सण उत्सवाचं वातावरण आहे. धनतेरस आणि दिवाळीला लोक नवीन गाड्या खरेदी करणे शुभ मानतात. अशा परिस्थितीत स्कूटर आणि बाईकच्या किमती कमी झाल्यामुळे विक्रीत जबरदस्त वाढ होण्याची शक्यता आहे. कंपन्या आणि ग्राहक दोघांसाठीही हे एक मोठे गिफ्ट ठरू शकतं.
पण, फक्त स्कूटरच नव्हे, तर बाईक सुद्धा आता स्वस्त होणार आहे. देशातील सर्वाधिक विकली जाणारी बाईक Hero Splendor वर सुद्धा ग्राहकांना फायदा मिळेल. तिची सध्याची किंमत 79,426 रुपये आहे, जी GST कमी झाल्यानंतर 71,483 रुपये राहील. म्हणजेच, Splendor च्या किमतीत सुमारे 7,943 रुपयांची घट होईल.