ब्लूमबर्ग दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन फेव्हरेट टेस्लाला आतापर्यंत भारतात फक्त 600 बुकिंग मिळाले आहेत. ही संख्या या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत दर चार तासांनी जागतिक स्तरावर टेस्लाने विकलेल्या संख्येइतकी आहे. कंपनीच्या अपेक्षेपेक्षा ही खूपच कमी आहे. भारत टेस्लासाठी एक अतिशय महत्त्वाची बाजारपेठ आहे, कारण कंपनीची युरोप आणि चीनमध्ये विक्री सतत प्रचंड प्रमाणात कमी होत आहे.
advertisement
शांघायाहून येते भारतात कार
टेस्ला आता या वर्षी भारतात 350 ते 500 कार पाठवण्याची योजना आखत आहे. शांघायाहून टेस्ला मॉडेल वाय वाहनांची पहिली तुकडी सप्टेंबरच्या सुरुवातीला येण्याची अपेक्षा आहे, ज्याची डिलिव्हरी मुंबई, दिल्ली, पुणे आणि गुरुग्रामपर्यंत असेल.
टेस्ला तोट्यात?
टेस्लाने या वर्षी आपला २,५०० कारचा वार्षिक कोटा पूर्ण करण्याची योजना आखली होती. पण, मजबूत ब्रँड अपील आणि एलन मस्क आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये वाद झाला होता. त्याचा परिणाम आता टेस्लाच्या बिझनेसवर दिसून येत आहे. एवढंच नाहीतर अमेरिका-भारत संबंधांमधील तणाव, उच्च आयात शुल्क आणि भारत अधिक किंमत संवेदनशील बाजारपेठ असल्याने कंपनीच्या भारतातील यशात अडथळा येत आहे.