TRENDING:

Tesla कारच्या काचा फोडून लोक येताय बाहेर, आली मोठी समस्या, 1,74,000 गाड्यांची होणार तपासणी

Last Updated:

टेस्लाच्या या कारमधील इलेक्ट्रिक दरवाजाचे हँडल फेल झाल्याचं समोर आलं आहे. बाहेरून दरवाजा उघडण्यास अडचणी येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमेरिकेच्या रस्त्यावर राज्य करणारी टेस्ला कंपनीला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकन सरकारच्या रस्ते सुरक्षा प्रशासनाकडून २०२१ मध्ये लाँच करण्यात आलेल्या टेस्ला Y मॉडेलची चौकशी सुरू केली आहे. जवळपास 1,74,000 टेस्ला (TSLA.O) मॉडेल Y ची तपासणी केली जात आहे. टेस्लाच्या या कारमधील इलेक्ट्रिक दरवाजाचे हँडल फेल झाल्याचं समोर आलं आहे. बाहेरून दरवाजा उघडण्यास अडचणी येत आहे. लहान मुलांना कारमध्ये बसवल्यानंतर जेव्हा बाहेरून दरवाजा उघडला जातो, तेव्हा दार उघडत नाही.
News18
News18
advertisement

टेस्लाच्या मॉडेल Y गाडीमध्ये एक गंभीर समस्या समोर आली आहे. या गाडीच्या दरवाजाचे हँडल अचानक काम करणे बंद करत आहेत. यामुळे गाडीचे दार उघडत नाहीये आणि गाडी आतून पूर्णपणे लॉक होत आहे. या समस्येमुळे अनेक पालकांना आपल्या मुलांना गाडीतून बाहेर काढण्यासाठी गाडीची काच तोडावी लागली आहे. काही प्रकरणांमध्ये, दरवाजाचे हँडल काम करत नसल्यामुळे खिडकीची काचही खाली येत नाही, त्यामुळे ही परिस्थिती आणखी धोकादायक बनते. यामुळे लहान मुलांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

advertisement

1,74,000 गाड्यांची होणार तपासणी

टेस्लाच्या गाड्यांमध्ये ही समस्या गंभीर झाली आहे. अमेरिकन सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासन (National Highway Traffic Safety Administration), जे गाड्यांची सुरक्षितता तपासतात, त्यांनी या प्रकरणाची तपासणी सुरू केली आहे. ते २०२१ च्या टेस्ला मॉडेल Y एसयूव्हीच्या खराब इलेक्ट्रॉनिक दरवाजाच्या हँडलच्या तक्रारींची तपासणी करत आहेत.

लोकांना काय समस्या आल्यात? 

advertisement

अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, जिथे पालक आपल्या मुलांना गाडीच्या मागील सीटवर बसवून स्वतः गाडीबाहेर आले, पण नंतर त्यांना परत गाडीत बसता आलx नाही. तसंच, ते आपल्या मुलांना गाडीतून बाहेरही काढू शकले नाहीत. यामुळे ही समस्या किती गंभीर आहे हे लक्षात येतं. हे प्रकरण खूपच चिंताजनक आहे आणि टेस्लाला यावर लवकरच काहीतरी उपाय करावा लागेल.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
Tesla कारच्या काचा फोडून लोक येताय बाहेर, आली मोठी समस्या, 1,74,000 गाड्यांची होणार तपासणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल