TRENDING:

स्टाइलसह मिळते दमदार सेफ्टी! फक्त 1.5 लाखांत मिळतेय 5 ड्यूल-चॅनल ABS बाइक्स

Last Updated:

Dual Channel ABS Bikes: तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला स्टाईलसोबतच सुरक्षितता हवी असेल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. ड्युअल-चॅनेल ABS असलेल्या पाच स्वस्त स्पोर्टी बाइक्सबद्दल जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतातील रस्ते सुरक्षा सुधारण्याच्या दिशेने, केंद्र सरकारने 1 जानेवारी 2026 पासून सर्व दुचाकी वाहनांमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) अनिवार्य करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ असा की आता बाइक सेगमेंटमध्ये सुरक्षितता एक आवश्यक फीचर बनली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ड्युअल-चॅनेल ABS असलेली बाइक घेणे शहाणपणाचे ठरू शकते. अशा 5 स्पोर्टी बाइक्सबद्दल जाणून घ्या, ज्या केवळ दिसण्यातच उत्तम नाहीत तर प्रगत सेफ्टी फीचर्सनी देखील सुसज्ज आहेत.
Dual Channel ABS Bikes
Dual Channel ABS Bikes
advertisement

TVS Apache RTR 200 4V

TVS Apache RTR 200 4V मध्ये 197.75cc ऑइल-कूल्ड इंजिन आहे जे तीन रायडिंग मोडमध्ये काम करते - स्पोर्ट (20.5 bhp), अर्बन आणि रेन (17 bhp).

या बाईकमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रॅश अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल/एसएमएस अलर्ट आणि रेस टेलीमेट्री सारख्या प्रगत फीचर्सचा समावेश आहे.

ड्युअल-चॅनेल ABSसह त्याची ब्रेकिंग कामगिरी उत्कृष्ट आहे आणि ती तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याची किंमत 1.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

advertisement

तुमच्या बाईकच्या पेट्रोल टँकमध्येही वारंवार पाणी जातं का? या ट्रिकने दूर होईल प्रॉब्लम

2. Bajaj Pulsar N250 

तुम्ही आक्रमक दिसणारी आणि रायडिंगमध्ये मजबूत असलेली बाईक शोधत असाल तर Bajaj Pulsar N250 हा एक उत्तम पर्याय आहे.

यात 249.07cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे जे 24.1 bhp पॉवर आणि 21.5 Nm टॉर्क जनरेट करते. ही बाईक तीन ABS मोडसह येते.

advertisement

यात ट्रॅक्शन कंट्रोल, स्लिपर क्लच, गियर पोझिशन इंडिकेटर आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सारखी फीचर्स देखील आहेत.

3. Hero Xtreme 160R 4V

Hero Xtreme 160R 4Vमध्ये 163.2cc ऑइल-कूल्ड इंजिन आहे जे 16.6 bhp आणि 14.6 Nm  टॉर्क जनरेट करते.

पॅनिक ब्रेक अलर्ट आणि ड्युअल ड्रॅग मोड्स असलेली ही या सेगमेंटमधील पहिली बाईक आहे.

advertisement

याशिवाय, त्यात KYB यूएसडी फ्रंट फोर्क्स, LCD डिजिटल कन्सोल आणि ड्युअल-चॅनेल एबीएस सारखी प्रगत सेफ्टी फीचर्स आहेत.

Car ची एअरबॅग घेऊ शकते तुमचा जीव! अजिबात करु नका या चुका

4. Bajaj Pulsar N160

Bajaj Pulsar N160 ही एक स्टायलिश आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज 160cc बाईक आहे जी विशेषतः तरुण रायडर्ससाठी डिझाइन केलेली आहे.

advertisement

यात 160.3cc इंजिन आहे जे 17 bhp पॉवर आणि 14.6 Nm टॉर्क जनरेट करते.

बाईकमध्ये ड्युअल-चॅनेल ABS, USB चार्जिंग पोर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, गियर पोझिशन इंडिकेटर आणि फ्युएल इकॉनॉमी रीडआउट सारखी फीचर्स आहेत.

5. TVS Apache RTR 180

टीव्हीएस अपाचे RTR 180 मध्ये 177.4cc इंजिन आहे आणि ते स्पोर्ट आणि अर्बन/रेन सारख्या अनेक राइड मोडसह येते.

यामध्ये इंधन स्टेशन, हॉस्पिटल आणि रेस्टॉरंट माहिती, कॉल आणि एसएमएस अलर्ट तसेच क्रॅश अलर्ट यासारख्या स्मार्ट कनेक्टिव्हिटी फीचर्सचा समावेश आहे.

मराठी बातम्या/ऑटो/
स्टाइलसह मिळते दमदार सेफ्टी! फक्त 1.5 लाखांत मिळतेय 5 ड्यूल-चॅनल ABS बाइक्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल