टोयोटाने URBAN Cruiser Taisor च्या सगळ्याच व्हेरिएंटमध्ये E, S, S+, V आणि G मध्ये 6 एअरबॅग्स देणे अणिवार्य केलं आहे. या एसयूव्हीमध्ये फ्रंट, साइड आणि कर्टन एअरबॅग्स दिले आहे. ज्यामुळे कारमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा अधिक चांगली होणार आहे. कंपनीने हे बदल भारत सरकारने केलेल्या सेफ्टी धोरणामुळे केली आहे.
advertisement
URBAN Cruiser Taisorचे फिचर्स
टोयोटा नेहमी आपल्या गाड्यांमध्ये दमदार असे फिचर्स देत असते. URBAN Cruiser Taisor मध्ये सुद्धा फिचर्सची कोणती कमी नाही. या एसयूव्हीमध्ये LED हेडलाईट, ट्विन LED DRLs, रिअर एसी वेंट्स, टुअल टोन इंटीरिअर, पार्किंग सेंसर्स, क्रूज कंट्रोल, वायरलेस चार्जर, 360 डिग्री कॅमेरा आणि ऑटोमैटिक क्लाइमेट कंट्रोल सारखे दमदार फिचर्स दिले आहे. या एसयूव्हीमध्ये हाइट एडजेस्टेबल ड्राइव्हर सीट दिले आहे.
URBAN Cruiser Taisor मायलेज आणि किंमत
URBAN Cruiser Taisor मध्ये तुम्हाला 998 सीसी पेट्रोल इंजिन मिळेल, जे 98.69 bhp पॉवर आणि 147.6 Nm चा टॉर्क जनरेट करतो. या कारमध्ये 37 लिटर इंधन क्षमता असलेली टाकी आहे. Cruiser Taisor चं मायलेज बघितलं तर 20 kmpl शानदार मायलेज देते. टोयोटाच्या या एसयूव्हीमध्ये 308 लिटरचा मोठा बूट स्पेस दिला आहे. टोयोटा URBAN Cruiser Taisor ची किंमतही एक्स-शोरूम 7.88-13.19 लाख रुपयांपासून आहे.