नवीन ग्राफिक्स
TVS Raider Super Squad Edition मध्ये डेडपूल आणि वोल्व्हरिनच्या कॅरेक्टरला प्रेरित होऊन नवीन डेकल्स आणि ग्राफिक्स आहेत, ज्यामुळे Raider 125 सीसी सेगमेंटमध्ये एक दमदार डिझाइन दिसत आहे. या बाइकमध्ये ३-व्हॉल्व्ह इंजिन आहे जे ७,५०० आरपीएमवर ११.२ बीएचपी आणि ६,००० आरपीएमवर ११.७५ एनएम टॉर्क निर्माण करते. नवीन अपडेटमध्ये आयजीओ असिस्टसह बूस्ट मोड आणि ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी (जीटीटी) समावेश केला आहे.
advertisement
रिव्हर्स एलसीडी डिजिटल क्लस्टर
Raider 125 मध्ये रिव्हर्स एलसीडी डिजिटल क्लस्टरचा देखील फायदा होईल, जो ८५ हून अधिक कनेक्टेड फीचर्ससह येतो. ज्यामुळे रेडरचे टेक-सेव्ही अपील होते. २०२३ मध्ये आयर्न मॅन आणि ब्लॅक पँथर सारखे मॉडेल लाँच केले होते. आता मार्व्हल-थीम असलेल्या मोटारसायकली भारतात सादर करणारा टीव्हीएस हा पहिला ब्रँड होता.
दरम्यान, सुपरहिरोचे फॅन असलेल्या तरुण ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून टीव्हीएसने या बाइक लाँच केल्या आहेत. नवीन डेडपूल आणि वुल्व्हरिन मॉडेलसह, टीव्हीएसने जनरेशन झेडशी असलेलं त्याचं कनेक्शन आणखी मजबूत केलं आहे. नवीन Raider 125 सुपर स्क्वॉड एडिशन (एसएसई) ची किंमत ९९,४६५ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि या महिन्यापासून सर्व टीव्हीएस डीलरशिपवर उपलब्ध असेल.
