TVS M1-S ही लवकरच भारतात लाँच होईल अशी शक्यता आहे, पण त्याबद्दल कंपनीने अधिकृतरित्या जाहीर केलं नाही. पण तुर्तास कंपनी मार्केटमध्ये असलेल्या आपल्या ईलेक्ट्रिक स्कुटरच्या विक्रीवर भर देणार आहे. यामध्ये लोकप्रिय iQube, आणि अलीकडेच लाँच झालेली Orbiter आणि प्रीमियम TVS X चा समावेश आहे. M1-S चं ग्लोबल लाँचिंग मुख्यपणे हे आपल्या ईलेक्ट्रिक वाहनांकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्रयत्न आहे. आधीच ION Mobility ही सक्रिय असून TVS आता आपल्या EV स्कुटरची विक्री वाढवत आहे.
advertisement
दमदार पॉवर
TVS M1-S ही मॅक्सी-स्कूटर डिझाइनवर तयार केलेली आहे आणि ती एका अगदी नवीन प्लॅटफॉर्मवर चालते. परफॉर्मन्सच्या बाबतीत हा स्कूटर खूपच दमदार आहे, यात 4.3 kWh ची बॅटरी पॅक आणि 12.5 kW ची इलेक्ट्रिक मोटर बसवलेली आहे, जी 254 Nm चा जबरदस्त टॉर्क निर्माण करते. ही स्कूटर एकदा चार्जमध्ये 150 km ची रेंज देते आणि या स्कुटरचा टॉप स्पीड 105 kmph इतका आहे. एवढंच नाहीतर फक्त 3.7 सेकंदांत 0 ते 50 kmph इतका स्पीड गाठते. यात मल्टिपल रायडिंग मोड्ससोबतच मोटर-असिस्टेड रिव्हर्स गिअर देखील देण्यात आले आहे.
हायटेक फीचर्स
TVS M1-S टेक्नलॉजीच्या बाबतीत खूपच हायटेक आहे. यात ट्विन प्रोजेक्टर LED हेडलाईट्स आणि आयब्रो-शेप DRLs दिल्या आहेत. रायडरला 7-इंच चा फुल-कलर TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो, जो स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS) सारखे फीचर्स आहे. यात एक स्मार्ट-की सिस्टीम, बिल्ट-इन ऑनबोर्ड चार्जर, ॲप कनेक्टिव्हिटी, आणि मोबाइल चार्जिंगसाठी एक USB-A पोर्ट दिला आहे.
