मिळालेल्या माहितीनुसार, जॉर्जियामध्ये Hyundai मोटर्सचा एक मोठा प्लांट आहे. ही कोरियन ऑटोमोबाइल Hyundai कंपनी येथे विशेषतः इलेक्ट्रिक वाहनं तयार करतं. हा प्लांट जवळपास ३००० एकरमध्ये पसरलेला आहे. इथं गेल्या सुमारे एका वर्षांपासून काम सुरू होतं. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांविरोधात आधीच वॉरंट जारी करण्यात आलं होतं. या कर्मचाऱ्यांना जॉर्जियाच्या फोकस्टन येथील एका केंद्रात ठेवण्यात आलं आहे. सध्या, त्यांना पुढील कार्यवाहीसाठी हलवण्याबाबत चर्चा सुरू आहे. अधिकाऱ्यांनुसार, सुरक्षा तपासणीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी 'सिंगल साइट एन्फोर्समेंट' कारवाई होती.
advertisement
कोरियन सरकाराने व्यक्त केली नाराजी
अमेरिकेच्या अधिकाऱ्याच्या कारवाईमुळे दक्षिण कोरियन सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे. दक्षिण कोरियाचं परराष्ट्र मंत्रालय या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहे. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना जॉर्जियाला पाठवणार आहे. कोरियन सरकारने अमेरिकन दूतावासाशीही संपर्क साधला आहे आणि कोरियन नागरिकांच्या बाबतीत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, ही कारवाई अनेक महिन्यांच्या नियोजनाचा भाग होती. या कारवाईचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यात कर्मचारी आणि कामगार रांगेत उभे असल्याचं दिसत आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे Hyundai च्या प्लांटवर काम थांबलं आहे, त्यामुळे बॅटरी प्लांटच्या कामावरही परिणाम झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता आधीच इशारा
विशेष म्हणजे, ही कारवाई अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा दक्षिण कोरियाच्या अनेक कंपन्या अमेरिकेतील उद्योगांमध्ये येत्या काळात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. मात्र, याला टॅरिफपासून वाचवण्याचा एक मार्ग मानले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात कागदपत्रं नसलेल्या अप्रवासींना बाहेर काढण्याचे आदेश दिले होते. याअंतर्गत अनेक देशांच्या नागरिकांना अमेरिकेतून बाहेर पाठवण्यात आले आहे.