विधिमंडळामध्ये महाराष्ट्र मोटार वाहन कर विधेयक 2026 मध्ये सुधारणा करण्यात आली असून एकमताने मंजुरी दिली आहे. राज्यात पर्यावरण संरक्षण, औद्योगिक विकास साधण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आलं. वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रदुषण करणाऱ्या वाहनांवर आता पर्यावरण कर वाढवण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
दुचाकीसाठी २ हजार आणि कारसाठी ४ हजार कर
advertisement
महाराष्ट्र मोटार वाहन कर विधेयक 2026 नुसार सुधारित कर रचना लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत दुचाकीवर आता २००० रुपये पर्यावरण कर आकारला जात होता, तो आता ४ हजार रुपये आकारला जाणार आहे. पेट्रोल वाहनांसाठी ३००० रुपये आकारला जात होता, तो कर आता ६ हजार रुपयांवर करण्यात आला आहे. तर डिझेल वाहनांसाठी ७ हजार रुपये कर आकारला जाणार आहे. हाच कर आधी ३५०० रुपये होता. पर्यावरण कर हा ५ वर्षांसाठी एकरक्कमी आकारला जाणार आहे. या नवीन पर्यावरण करामुळे राज्याला दरवर्षी जवळपास १६० कोटी रुपये अतिरिक्त महसूल प्राप्त होईल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. या निधीतून रस्ते सुरक्षा, आधुनिक परिवहन सुविधा, ATS प्रणाली आणि प्रशिक्षणसाठी वापरणार आहे.
दरम्यान, अलीकडे राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. या अर्थसंकल्पामध्ये प्रदुषण कमी करण्यासाठी आता जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता जर तुमच्याकडे जुनी गाडी असेल तर ३० टक्क्यांपर्यंत जास्त टॅक्स भरावा लागणार आहे. तर दुसरीकडे जे लोक आपली जुनी गाडी स्क्रॅपमध्ये देणार आहे. यापुढे राज्यामध्ये ज्यांच्याकडे जुन्या गाड्या आहे त्यांना ग्रीन टॅक्स दुप्पट भरावा लाागणार आहे. विशेष म्हणजे, BS-4 किंवा त्यापेक्षा जुनी गाडी असेल तर 'एमिशन नॉर्म्स' असलेल्या खासगी वाहनांवर हा टॅक्स वाढवण्यात आलाा आहे. या गाड्या प्रदूषण जास्त करतात म्हणून हा निर्णय घेतला आहे.
नवीन स्क्रॅप धोरण
तसंच, जुनी गाडी जर स्क्रॅपसाठी द्यायची ठरली तर ज्यांच्याकडे BS-4 किंवा त्यावरील गाडी स्क्रॅप केली आणि नवीन गाडी खरेदी केली तर जवळपास १६ टक्के टॅक्स सवलत मिळणार आहे. नवी गाडी खरेदी करताना हा मोटार वाहन करात ही सवलत दिली जाणार आहे. तसंच, ज्यांच्याकडे BS-3 किंवा त्यापेक्षा जुनी गाडी असेल तर स्क्रॅपलाा दिली तर सुमारे ३० टक्क्याांपर्यंत सवलत मिळणार आहे.
