इंजिन सुरू करू नका: तुमच्या गाडीत पाणी शिरले असेल तर तुम्ही इंजिन सुरू न करण्याची काळजी घ्यावी. जर तुम्ही असे केले तर पाणी इंजिनच्या आत आणखी जाऊ शकते, ज्यामुळे नुकसान वाढू शकते.
इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा: पाण्यामुळे गाडी थांबली तर तुम्ही प्रथम इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करावीत, जर तुम्ही असे केले नाही तर ते खराब होऊ शकतात आणि शॉर्ट सर्किट होऊ शकते. या उपकरणांमध्ये हेडलाइट्स, रेडिओ इत्यादींचा समावेश आहे.
advertisement
लायसेन्सशिवाय चालवता येतील या स्कूटर! टॉप स्पीड आहे 25km, विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑप्शन
सुरक्षित ठिकाणी जा: शक्य असल्यास, कारमधून बाहेर पडा आणि सुरक्षित ठिकाणी जा, जे थोडे उंच आहे, असे करून तुम्ही कोणत्याही संभाव्य धोक्यापासून स्वतःला वाचवू शकता.
आपत्कालीन सेवेला कॉल करा: आजकाल तुम्हाला कारमध्ये रोडसाईड असिस्टन्स सेवा मिळते. ज्यामध्ये टोइंग सर्व्हिस किंवा मेकॅनिकला कॉल करता येते आणि ते तुम्हाला त्वरीत मदत करू शकतात. जर तुमच्या कारमध्ये काही समस्या असेल तर ते ती दुरुस्त करतात किंवा जवळच्या सर्व्हिस स्टेशनवर घेऊन जातात आणि ती दुरुस्त देखील करतात.
फॅमिलीसाठी कार खरेदी करताय? या 4 गाड्या आहेत बेस्ट, मिळते 5 स्टार रेटिंग
इन्शुरन्स चेक करा: पाण्यामुळे नुकसान झाले असेल तर तुमच्या विमा कंपनीशी संपर्क साधा आणि क्लेम प्रोसेस सुरू करा, तसेच सर्व पुरावे आणि कागदपत्रे गोळा करा जेणेकरून क्लेम प्रोसेस लवकर पुढे जाईल.