TRENDING:

TVS ची 226 किमी मायलेज देणारी Jupiter कधी होणार लाँच? कंपनी का करतेय विलंब?

Last Updated:

  Jupiter CNG चं मायलेज हे तब्बल 226 किमी असेल असा दावा केला होता. पण, Jupiter CNG च्या लाँचिंगचा मुहूर्त अजूनही टीव्हीएसला सापडेना झालाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सध्या भारतात कमी किंमत आणि चांगलं मायलेज असणाऱ्या स्कुटर खरेदीकडे मध्यमवर्गीय लोकांचा कल वाढला आहे.  हे डोळ्यासमोर ठेवून आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी  TVS मोटर्सने मार्केटमध्ये स्कुटर सेगमेंटममध्ये आपल्या Jupiter मुळे दबदबा कायम राखून ठेवला आहे. Jupiter ही सर्वाधिक विक्री होणारी स्कुटर आहे. कमी किंमत चांगल्या मायलेजमुळे Jupiter घराघरात पोहोचली. पण, आता Jupiter चं सीएनजी व्हर्जन येणार आहे.  Jupiter CNG चं मायलेज हे तब्बल 226 किमी असेल असा दावा केला होता. पण, Jupiter CNG च्या लाँचिंगचा मुहूर्त अजूनही टीव्हीएसला सापडेना झालाय.
News18
News18
advertisement

जानेवारी २०२५ मध्ये दिल्लीत झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये  TVS ने Jupiter CNG लाँच केली होती. बजाजच्या फ्रीडम १२५ नंतर ही जगातली पहिली सीएनजी स्कुटर ठरली आहे.  पण वर्ष झालं तरी Jupiter CNG मॉडेल काही लाँच झालं नाही.  2024 मध्ये बजाजने जगातील पहिली CNG बाईक – Freedom 125 लॉन्च करून सगळ्यांना आश्चर्यचकित केलं होतं. आता, विक्रीला एक वर्ष झालंय, पण विक्री काही खास नाही. अनेकांनी याचं कारण CNG स्टेशन कमी आहेत असं सांगितलं – पण तसं नाही.

advertisement

ग्रामीण भागातही बरेच CNG स्टेशन आहेत. मग खरी अडचण काय? खरी अडचण म्हणजे माहितीची कमतरता – अनेकांना अजूनही माहित नाही की अशी बाईक विक्रीला आहे. कारण, फक्त एकच CNG प्रोडक्ट उपलब्ध आहे. कारसाठी CNG चांगला पर्याय आहे. पण बाईक घेणारे लोक अजून CNG बाईकला तयार नाहीत. म्हणूनच TVS अजून Jupiter CNG बद्दल खात्रीशीर नाही. त्यांना वाटतं की, लोक 125cc किंवा 110cc पेट्रोल मॉडेलच घेतील आणि CNG वर्जन घेतल्यावर खर्च आणि जबाबदारी वाढेल. म्हणूनच TVS अजून काही घोषणा करत नाहीये.

advertisement

अनेकांना वाटू शकतं की ब्रँडने नुकतीच नवीन बाईक लॉन्च केली आहे. कदाचित Jupiter ची लोकप्रियता RTX ची विक्री कमी करेल. पण तसं नाही. RTX घेणारे ग्राहक आणि Jupiter CNG घेणारे वेगळे आहेत. पण दुसरीकडे Suzuki ने Access CNG लॉन्च केलं आहे. Access CNG भारतात Jupiter CNG ला टक्कर देईल. आता पर्याय उपलब्ध असतील, तर TVS ला बजाजसारखी अडचण येणार नाही असं वाटतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कापूस आणि तुरीच्या दरात उलथापालथ, सोयाबीनची कशी राहीली स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

त्यामुळे आता Jupiter CNG  काही महिन्यांत TVS काही घोषणा करू शकते. Jupiter CNG ही 125cc मॉडेलवर आधारित आहे. तेच इंजिन, तीच डिझाईन – पण यावेळी अंडर सीट स्टोरेज कमी मिळेल. कारण, CNG टाकी सीटखाली बसवली जाईल. स्कूटरमध्ये 1.4 किलो CNG टाकी आणि 2 लिटर पेट्रोल टाकी मिळणार आहे या सेटअपमुळे TVS ची Jupiter CNG ही तब्बल  226 किमी रेंज देईल असा  दावा कंपनीने केला आहे. कारण, CNG वर चालवताना खर्च कमी येईल आणि मायलेज जास्त मिळेल. पण, CNG वर चालवताना पॉवर थोडी कमी जाणवणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
TVS ची 226 किमी मायलेज देणारी Jupiter कधी होणार लाँच? कंपनी का करतेय विलंब?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल