कापूस आणि तुरीच्या दरात उलथापालथ, सोयाबीनची कशी राहीली स्थिती? इथं चेक करा

Last Updated:

6 जानेवारी रोज मंगळवारी राज्यातील कृषी मार्केटमध्ये प्रमुख शेतमालाच्या दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले. कपाशीच्या दरात किंचित वाढ नोंदवली गेली असताना, कांदा आणि तुरीच्या दरात घसरण झाली आहे.

+
Maharashtra

Maharashtra Krushi Market updates 

अमरावती : 6 जानेवारी रोज मंगळवारी राज्यातील कृषी मार्केटमध्ये प्रमुख शेतमालाच्या दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले. कपाशीच्या दरात किंचित वाढ नोंदवली गेली असताना, कांदा आणि तुरीच्या दरात घसरण झाली आहे. तर सोयाबीनचे दर स्थिर राहिले आहेत. आज राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये आवक वाढली असून दरांवर त्याचा परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पाहुयात, प्रमुख शेतमालाची आवक किती झाली? भाव किती मिळाला?
कपाशीच्या दरात काहीशी वाढ
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये कपाशीची एकूण आवक 25 हजार 233 क्विंटल इतकी झाली. 6 हजार 200 क्विंटल सर्वाधिक आवक वर्धा मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी कमीतकमी 7400 ते जास्तीत जास्त 8045 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. वर्धा मार्केटमध्ये आज कपाशीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला. सोमवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात किंचित वाढ झाली आहे.
advertisement
कांद्याच्या दरात घट
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये 2 लाख 27 हजार 924 क्विंटल कांद्याची आवक झाली. यातील नाशिक मार्केटमध्ये 69 हजार 990 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्याठिकाणी कांद्याला कमीतकमी 430 ते जास्तीत जास्त 1775 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या कांद्याला सर्वाधिक 2700 रुपये बाजारभाव मिळाला. सोमवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात घट झालेली दिसून येत आहे.
advertisement
सोयाबीनचे दर स्थिर
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 66 हजार 801 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज सोयाबीनची 16 हजार 904 क्विंटल सर्वाधिक आवक लातूर मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी सोयाबीनला कमीत कमी 4198 ते जास्तीत जास्त 4948 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. सोयाबीनला 5328 रुपये सर्वाधिक बाजारभाव सातारा मार्केटमध्ये मिळाला. सोमवारी मिळालेला सर्वाधिक दर आज स्थिर आहे.
advertisement
तुरीच्या दरात घट
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 23 हजार 740 क्विंटल तुरीची आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये 6 हजार 563 क्विंटल पांढऱ्या तुरीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. त्याठिकाणी तुरीला 6036 ते 7375 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आलेल्या 2 क्विंटल काळ्या तुरीला 8000 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला. सोमवारी मिळालेल्या दराच्या तुलनेत आज तुरीच्या सर्वाधिक दरात घट झालेली दिसून येत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
कापूस आणि तुरीच्या दरात उलथापालथ, सोयाबीनची कशी राहीली स्थिती? इथं चेक करा
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement