इंजिन आणि फीचर्सबद्दल जाणून घ्या
यामाहा RayZR 125 Fi हायब्रिडच्या या स्कूटरमध्ये तुम्हाला 125 cc ब्लू कोर हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे. जे 8.2 PS आणि 10.3 Nm टॉर्क जनरेट करते. या स्कूटरमध्ये डिस्क ब्रेक सिस्टम आहे, जी स्कूटरला अगदी सहजपणे नियंत्रित करते. या स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, LED हेडलाइट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्कूटरचे कर्ब वेट 99 किलो आहे. RayZR 125 Fi हायब्रिडच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, या स्कूटरला 71.33 kmpl चा उत्तम मायलेज मिळतो.
advertisement
Fastag अॅन्युअल पास उद्या होणार सुरु! जाणून घ्या तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
यामाहा Fascino 125 Fi हायब्रिडबद्दल बोलायचे झाले तर, या स्कूटरमध्ये 125 cc इंजिन आहे. जे 8.2 PS आणि 10.3 Nm टॉर्क जनरेट करते. या स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, LED हेडलाइट, LED टेल लाईट, DRL आहेत, जे खूपच मस्क्युलर दिसतात. Fascino 125 Fi हायब्रिडच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, ही स्कूटर 68.75 kmpl चा मायलेज देते. या स्कूटरमध्ये डिस्क ब्रेक आहे, ज्यामुळे स्कूटर सहजपणे कंट्रोल करता येते.
Electric Car की CNG car, पाहा तुमच्यासाठी कोणती कार आहे बेस्ट
येथे किंमत पहा
Yamaha Fascino 125 Fi Hybrid च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची (एक्स-शोरूम) किंमत 94,090 रुपये आहे. त्याच वेळी, Yamaha RayZR 125 Fi Hybrid ची किंमत 88,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे. दोन्ही स्कूटरमध्ये उत्तम फीचर्स जोडण्यात आले आहेत तसेच नवीन कलर ऑप्शन देखील पाहायला मिळतात.