Zelio Electric Zello Night चं डिझाइन स्टँडर्ड नाईटसारखंच आहे, पण, त्यात चांगले फिचर्स दिले आहे. या नाईट+ हे दररोजच्या भारतीय रायडरसाठी डिझाइन केलेले आहे. एलएफपी बॅटरीपासून ते हिल होल्ड कंट्रोल आणि फॉलो-मी-होम हेडलॅम्प सारख्या सुरक्षा फिचर्स दिले आहे.
डिझाइन कसं?
डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर, झेलो नाईट+ मध्ये मोठ्या हेडलॅम्प आणि एलईडी टर्न इंडिकेटरसह रेक्ड फ्रंट एप्रन आहे. त्यात सिंगल-पीस सीट आणि मागील बाजूस टेपर करणारा एक टोकदार अँगुलर सिल्हूट आहे. नाईट+ ची एकूण डिझाइन स्वच्छ आणि साधी आहे.. हे दोन सिंगल-टोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: ग्लॉसी व्हाइट आणि ग्लॉसी ब्लॅक, आणि मॅट ब्लू अँड व्हाइट, मॅट रेड अँड व्हाइट, मॅट यलो अँड व्हाइट आणि मॅट ग्रे अँड व्हाइट असे ४ ड्युअल-टोन रंग आहेत.
advertisement
फिचर्स
Zello Night + मध्ये फॉलो-मी-होम हेडलॅम्प, यूएसबी चार्जिंग पोर्ट, क्रूझ कंट्रोल आणि पोर्टेबल बॅटरीचा समावेश आहे. सुरक्षिततेसाठी, दोन्ही बाजूने ड्रम ब्रेक आणि हिल होल्ड कंट्रोल देण्यात आले आहे. झेलो नाईट+ मध्ये १.८ किलोवॅट प्रति तास पोर्टेबल एलएफपी (लिथियम फेरस फॉस्फेट) बॅटरी आहे, जी १०० किमीची वास्तविक रेंज देते. थर्मल सेफ्टी आणि सोपे होम चार्जिंग पर्यायही आहे. ही पोर्टेबल बॅटरी १.५ किलोवॅट मोटरला पॉवर देते. इलेक्ट्रिक स्कूटर ५५ किमी प्रतितास या कमाल वेगापर्यंत पोहोचू शकते.
डिलिव्हरी झाली सुरू
इलेक्ट्रिक स्कूटरसाठी डिलिव्हरी बुकिंग आता सर्व झेलो डीलरशिपवर खुले आहे आणि डिलिव्हरी २० ऑगस्ट २०२५ पासून सुरू होतील. झेलो इलेक्ट्रिक सध्या बाजारात ४ सक्रिय मॉडेल्स ऑफर करते, त्यापैकी तीन कमी-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहेत - झूप, नाइट आणि झेडेन आणि एक झेडेन+ आरटीओ सेगमेंट अंतर्गत आहेत.