TRENDING:

वर्कलोडमुळे भारतात दरवर्षी 2 लाख मृत्यू, या सेक्टरमधील कर्मचारी सर्वाधिक तणावात

Last Updated:

नोकरीत यश मिळवण्यासाठी जास्तीत जास्त काम करणे हा ट्रेंड झाला आहे. मात्र आता यामुळे अनेक समस्या देखील निर्माण होत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली : नोकरीत यश मिळवण्यासाठी जास्तीत जास्त काम करणे हा ट्रेंड झाला आहे. अनेकांना स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठी ते जास्त काम करायला तयार असतात. मात्र असे करणं जीवघेणं आहे. नुकतंच कोचीतील एका चार्टर्ड अकाउंटंटचा (सीए) अतिकामामुळे मृत्यू झाला. ही घटना पुण्यात घडली. ॲना सेबॅस्टियन पेरायिल फक्त 26 वर्षांची होती. ही तिची पहिलीच नोकरी होती. चार महिन्यांपूर्वी तिने कंपनी जॉइन केली होती. फक्त चार महिन्यांत तिच्यावरील वर्कलोड इतका वाढला की तिचा मृत्यू झाला. ॲनाच्या आईने कंपनीला एक पत्र लिहून टॉक्सिक वर्क कल्चरबद्दल अनेक खुलासे केले. त्यानंतर वर्कलोडसंदर्भात चर्चा होत आहेत. मात्र तुम्हाला हे जाणून कदाचित आश्चर्य वाटेल की भारतात अतिकामचा ट्रेंड खूप कॉमन आहे.
News18
News18
advertisement

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, मागच्या वर्षी 30 देशांच्या मॅकेन्झी सर्व्हेत असं आढळलं की भारतातील 60% लोक कामाच्या ओझ्यामुळे खूप थकलेले आणि चिंताग्रस्त असतात. 2019 मधील एका रिपोर्टनुसार, मुंबई हे जगातील सर्वात कामसू शहर आहे. या बाबतीत राजधानी दिल्ली चौथ्या स्थानावर आहे. या यादीत हनोई दुसऱ्या आणि मेक्सिको सिटी तिसऱ्या स्थानावर आहेत. 2018 मधील एका सर्व्हेनुसार, भारतीयांना जगातील इतर सर्व देशांच्या तुलनेत खूप कमी सुट्ट्या मिळाल्या.

advertisement

आठवड्यात 55 तासापेक्षा जास्त कामामुळे मृत्यूचा धोका 

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) यांनी 2021 मध्ये जास्त काम केल्याने होणाऱ्या परिणामांवर एक अभ्यास केला होता. त्यानुसार आठवड्यात 35 ते 40 तास काम करणाऱ्यांच्या तुलनेत 55 तास किंवा त्याहून अधिक तास काम केल्याने मृत्युचा धोका अनेकपटींनी वाढू शकतो. तसेच जास्त काम केल्याने हेल्थ कॉम्प्लिकेशन्समुळे मरणाऱ्यांची सर्वाधिक संख्या भारतात होती, असेही अभ्यासातून उघड झाले. हा फक्त लोकसंख्येचा मुद्दा नाही, कारण चीनमध्ये जास्त लोकसंख्या असूनही भारताच्या तुलनेत परिस्थिती चांगली होती.

advertisement

एका वर्षात वर्कलोडमुळे दोन लाख मृत्यू

ॲनाची ईवाय कंपनीत पहिली नोकरी होती. फक्त चार महिन्यांत वर्कलोडमुळे तिचा मृत्यू झाला. भारतातील कोट्यवधी लोकांची हीच अवस्था आहे. ताज्या आकडेवारीनुसार, एका वर्षात दोन लाख भारतीयांचा अतिकामामुळे मृत्यू झाला. आयएलओच्या आकडेवारीनुसार, अर्ध्यापेक्षा जास्त नोकरी करणारे भारतीय (51.4%) दर आठवड्याला 49 तास किंवा त्याहून जास्त काम करतात. यात भूतान (61.3%) नंतर भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

advertisement

भारताचे आठवड्याचे सरासरी कामाचे तास 170 देशांमध्ये 13 व्या क्रमांकावर आहे. सर्वात जास्त कामाच्या तासांच्या बाबतीत भारताची परिस्थिती काँगो आणि बांगलादेश सारख्या देशांपेक्षाही वाईट आहे. संयुक्त अरब अमिरात आणि कतारसारखे अती श्रीमंत देश सोडल्यास बाकीच्या संपन्न देशांमधील कामाचे तास भारतापेक्षा खूप कमी आहेत. भारताचे दबावयुक्त वर्क कल्चर चीनपेक्षा वाईट आहे. चीनमधील लोक दर आठवड्याला सरासरी 46 तास काम करतात. चीनच्या '996' वर्क कल्चरचा अर्थ म्हणजे आठवड्यातून सहा दिवस सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत काम करणे. या वर्क कल्चरचे कौतुक चीनचे टेक टायकून जॅक मा यांनी केले होते.

advertisement

इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन सेक्टरमध्ये सर्वाधिक दबाव

अतिकामाचा सर्वाधिक दबाव भारतात इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन सेक्टरमध्ये आहे. आयएलओच्या आकडेवारीनुसार, या सेक्टरमधील कर्मचारी आठवड्यात 57.5 तास काम करतात, जे इंटरनॅशनल स्टँडर्डपेक्षा नऊ तास जास्त आहे. 20 सेक्टर्सपैकी 16 मधील कर्मचारी आठवड्यात 50 तास किंवा त्यापेक्षा जास्त काम करतात. भारतात प्रोफेशनल्स, शास्त्रज्ञ आणि टेक्निकल सेक्टरमध्येही 55 तास काम करावं अशी मागणी होते. भारतात आठवड्यातील सर्वात कमी 48 तासांचे काम कृषी आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रात होते.

सीनिअर्सपेक्षा ज्युनिअर्सवर जास्त कामाचा भार

आयएलोच्या आकडेवारीनुसार, तरुण कर्मचारी त्यांच्या सीनिअर्सपेक्षा जास्त तास काम करतात. 20 ते 30 वयोगटातील भारतीय कामगार आठवड्यातून 58 तास काम करतात. मिड 30 वय असलेले अंदाजे 57 तास काम करतात. सरासरी कामगार 50 पर्यंत पोहोचतो, तेव्हा तासांत सर्वाधिक घट होते. ते आठवड्यातून 53 तास काम करतात. पण हेही इंटरनॅशनल स्टँडर्ड 48 तासांपेक्षा खूप जास्त आहे.

जास्त तास काम केल्याने जीडीपी वाढत आहे का?

जास्त काम करून आपण आपल्या देशाच्या जीडीपीमध्ये किती योगदान देतो? असा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतात एक तासाचे काम जीडीपीमध्ये 8 डॉलरचे (650 रुपयांचे) योगदान देते. त्यामुळे लोक प्रॉडक्टिव्ह असतील तरच जास्त काळ काम करून पैसे कमावता येऊ शकतात. मात्र जास्त तास काम केल्याने प्रॉडक्टि्व्हिटी कमी होते. भारताची आठ डॉलरपेक्षा कमी लेबर प्रॉडक्टिव्हिटी कमी-उत्पन्न आणि निम्न-मध्यम उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांपेक्षा चांगली आहे. भारताची अर्थव्यवस्था निम्न-मध्यम उत्पन्न असलेली आहे. मात्र या आकाराच्या अर्थव्यवस्थेसाठी प्रतितास आठ डॉलर खूप कमी आहे. आउटसोर्सिंग स्पर्धक व्हिएतनाम प्रतितास 9.8 डॉलर्स, फिलिपिन्स 10.5 डॉलर्स प्रतितास, इंडोनेशिया 13.5 डॉलर्स प्रतितास कमवतात. दुसरा ओव्हरवर्क हब चीन 15.4 डॉलर्स कमवतो, जो इतर जास्त-उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांच्या उत्पादकतेच्या जवळपासही नाही.

मराठी बातम्या/करिअर/
वर्कलोडमुळे भारतात दरवर्षी 2 लाख मृत्यू, या सेक्टरमधील कर्मचारी सर्वाधिक तणावात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल