राज्यातून प्रथम क्रमांक
महाराष्ट्र कृषी अनुसंधान शिक्षण परिषद पुणे अंतर्गत आचार्य पदवीसाठी घेतल्या जाणाऱ्या सामूहिक निवड परीक्षेमध्ये अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील मौजा. नायगाव येथील उत्कर्षा सतीशराव ढेंमरे या विद्यार्थिनीने महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. उत्कर्षाचे प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागातून तर माध्यमिक शिक्षण चंद्रभागाबाई पाकोडे विद्यालय मंगरूळ दस्तगीर तसेच ज्युनिअर कॉलेजचं शिक्षण धामणगाव रेल्वे आणि कृषी शिक्षण संत शंकर महाराज कृषी विद्यालय पिंपळखुटा इथं झालं.
advertisement
पानाने नशीब पालटलं! 50 हजारांची नोकरी सोडून तरुण झाला लखपती
यानंतर मी मास्टर्ससाठी म्हणजे एमएससी साठी कृषी महाविद्यालय नागपूर इथं गेले. मास्टर्स सुरू असतानाच लॉकडाऊन लागलं, त्या दरम्यान मला कळलं की मृदा परीक्षण या विषयांमध्ये माझी आवड आहे. तेव्हा मी ठरवलं की याच विषयांमध्ये मी पुढील शिक्षण घेणार. त्यानंतर मला या आचार्य पदवीसाठीच्या निवड परीक्षेबद्दल कळलं आणि मी प्रयत्न केले आणि सर्वांच्या आशीर्वादामुळे मी ही परीक्षा देऊ शकले. मी माझ्या या यशाचे श्रेय आई-वडील, आजी-आजोबा तसेच ग्रुप जणांना देते असं उत्कर्षाने सांगितलं.
Photos: कापूस सारख्या दिसणाऱ्या या पिकाने शेतकऱ्याला बनवलं लखपती, आता वार्षिक 7 लाखांचं उत्पन्न
कौतुकांचा वर्षाव
आता आचार्य पदवी घेण्यासाठी उत्कर्षानं उंच भरारी घेतली असून तिची मेहनत फळाला आली आहे. तिने महाराष्ट्र राज्यातून MCAER CET या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावत आई-वडिलांसह अमरावती जिल्ह्याचं नाव उंचावलय. आतापर्यंत मिळविलेल्या घवघवीत यशाचं उत्कर्षा आपल्या आईवडील, आजी आजोबा, शिक्षक मार्गदर्शक गुरुजनांना देते आहे. छोट्याशा गावातील विद्यार्थिनी उत्कर्षा तिने घेतलेल्या उत्तुंग भरारीमुळे तिच्यावर समाजातून सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.





