टेम्पो चालवता चालवता आकाशाला गवसणी! टेम्पोचालकाची उंच भरारी; उभारली विमान कंपनी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Tempo Driver Become Airline Company Owner : भारतातील नवीन विमान कंपनी शंख एअरबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. पण त्याहूनही अधिक चर्चा कंपनीचा मालक श्रवण कुमार विश्वकर्माची होते आहे. टेम्पो चालवणारा हा माणूस आज विमान कंपनीचा मालक कसा काय बनला?
भारतातील एक नवीन विमान कंपनी शंख एअरबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे. पण त्याहूनही अधिक लक्ष या कंपनीचा संस्थापक आणि अध्यक्ष श्रवण कुमार विश्वकर्मा यांच्या आयुष्याकडे वेधलं गेलं आहे. आज एका विमान कंंपनीचा मालक असलेला श्रणव टेम्पो चालवत होता. तो कसा काय एका एअरलाइन कंपनीचा मालक बनला? पाहुयात.
श्रवणचा जन्म उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. श्रवणला अभ्यासात रस नव्हता आणि त्याने लहान वयातच शाळा सोडली. आर्थिक अडचणींमुळे श्रवणने जवळजवळ एक वर्ष कानपूरच्या रस्त्यावर टेम्पो चालवला. माल चढवणं, उतरवणं, आणि खांद्यावर सामान वाहून नेणं. अशी कामं त्याने केली. पण त्याने कधीही हार मानली नाही. कठोर परिश्रम, समर्पण आणि हुशार निर्णयांनी त्याने अशक्य ते शक्य केलं. ते कसं काय?
advertisement
श्रवणची कहाणी 2010 च्या दशकात सुरू झाली. टेम्पो चालवल्यानंतर त्याने लहान व्यवसायात पाऊल ठेवलं. आधी त्याने स्टील ट्रेडिंग (विशेषतः टीएमटी बार), नंतर सिमेंट, खाणकाम आणि वाहतूक क्षेत्रात पाय ठेवला. यापैकी बहुतेक व्यवसायात तो यशस्वी झाला. 2022 मध्ये त्याने त्याची प्रमुख कंपनी शंख एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड सुरू केली. जी बांधकाम साहित्य, सिरेमिक, काँक्रीट उत्पादने आणि घाऊक व्यापार करते. ही कंपनी आता कोट्यवधींची उलाढाल करते आणि श्रावणच्या व्यावसायिक साम्राज्याचा पाया रचते.
advertisement
चार वर्षांपूर्वी 2021-22 मध्ये श्रवणला विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश करण्याची कल्पना सुचली. भारतात हवाई प्रवास गरज बनत आहे, पण मध्यमवर्गासाठी तो महागडा होता, इंडिगोसारख्या मोठ्या कंपन्यांवर जास्त अवलंबून राहिल्याने अनेकदा उड्डाणं रद्द करण्यासारख्या समस्या निर्माण होत होत्या. हे त्याच्या लक्षात आलं. मग विमानांना बस किंवा टेम्पोसारखं वाहतुकीचं सामान्य साधन का बनवू नये? असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने शंख एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड सुरू करत शंख एअरलाइन्सची पायाभरणी केली.
advertisement
श्रवणचे वडील दररोज शंख वाजवत, त्यामुळे त्याने एअरलाइन कंपनीचं नाव शंख एअर हे ठेवलं. कंपनीचं उद्दिष्ट उत्तर प्रदेशातील पहिली खाजगी शेड्युल्ड एअरलाइन बनण्याचं आहे. डिसेंबर 2025 मध्ये नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाल्यानंतर 2026 च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) उड्डाणे सुरू होणार आहेत. सुरुवातीला तीन एअरबस ए320 विमाने भाड्याने घेतली जातील, जी लखनौला दिल्ली, मुंबई आणि इतर महानगरांशी जोडतील. उत्तर प्रदेशातील अंतर्गत शहरं जशी की गोरखपूर आणि वाराणसीदेखील जोडली जातील. कंपनीची योजना आहे की 2-3 वर्षांत त्यांचा ताफा 0-25 विमानांपर्यंत वाढवावा आणि 2028-29 पर्यंत आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू करावेत.
advertisement
श्रवणचा दृष्टिकोन स्पष्ट आहे, "विमानं ही लक्झरी नाहीत, ती फक्त वाहतुकीचा एक प्रकार आहेत." मध्यमवर्गीय आणि पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्यांसाठी परवडणारं भाडे, विश्वासार्ह सेवा आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रीत केलं जाईल. तो जास्त किंमत टाळेल, म्हणजे सणांच्या काळातही तिकिटांच्या किमती गगनाला भिडणार नाहीत.
view commentsLocation :
Uttar Pradesh
First Published :
Jan 04, 2026 1:44 PM IST










