इथं मिळतो 'खराब चाय', तरीही असते गर्दी; एकदा चव चाखली ही लोक पुन्हा पुन्हा येतात
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kharab Chai Shop : खराब चायचं दुकान, तरी इथं लोकांची गर्दी हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. हे दुकान कोणतं आणि लोक तिथं का जातात हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
चहा म्हणताच अनेकांना चहा हवाहवासा झाला असेल. भारतात चहाप्रेमींची कमी नाही. त्यामुळे तुम्हाला रस्त्यावर, ऑफिसमध्ये, स्टेशनवर, बस स्टँडवर जाल तिथं चहाची टपरी, चहाचं दुकान किंवा चहावाला दिसेल. कुठे चहा चांगला मिळतो, कुठे नाही याची माहितीही चहाप्रेमींना असते. शक्यतो लोक जिथं चांगला चहा मिळतो तिथंच जातात. पण आम्ही तुम्हाला सांगितलं की एक असं ठिकाण जिथं खराब चाय मिळतो तरी लोकांची गर्दी असते, तर?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या दुकानातील चहाविक्रेता राजेश कुमार गौरा बसंतपूर इथं राहणारा जो आधी पान स्टॉल चालवत होता. 3 वर्षांपूर्वी त्याने चहाचं दुकान उघडलं. तो म्हणाला चहाच्या दुकानांमध्ये स्वादिष्ट, मैत्री चहा असे वेगवेगळ्या नावांचे बोर्ड दिसतात म्हणून मला खराब चाय असं बोर्ड लावण्याची आयडिया आली आणि मी ते केलं. (सर्व फोटो प्रतीकात्मक)









