Success Story : कॅफेतला वेटर झाला आर्मी जवान, शेतमजूर आईच्या कष्टाचं केलं सोनं, विकासची BSF मध्ये निवड

Last Updated:

भारतीय सेना दिनाच्या दिवशीच बीएसएफ दलात त्याची निवड झालीये. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने हे यश मिळवल्याने त्याला आकाश ठेंगणं झालंय.

+
News18

News18

परभणी : जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर यशाचा कोणताही टप्पा गाठता येतो. परभणी जिल्ह्यातील सेलू येथील ब्राम्हणगावच्या विकास शिनगारे या तरुणाने सिद्ध करून दाखवलं आहे. भारतीय सेना दिनाच्या दिवशीच बीएसएफ दलात त्याची निवड झालीये. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने हे यश मिळवल्याने त्याला आकाश ठेंगणं झालंय.
विकास रमाबाई यादव शिनगारे यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ब्राम्हणगाव गावातच झालं. यानंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सेलू येथे पूर्ण केलं. बी.कॉम करत असतानाच एका कॅफेत वेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. आई शेतमजुरी करून घर चालवायची, वडील लहानपणीच वारले. भाऊ दीपक शिनगारे दुकानात काम करून पैसे पाठवायचा. सगळ्यांच्या कष्टाचं चीज करत विकास याने उत्तुंग भरारी घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
advertisement
माझे 10 वी पर्यंतचे शिक्षण गावाकडे झाले आणि नंतर मी सेलू येथे नूतन महाविद्यालयात कॉमर्स घेतले आणि नंतर B.com पूर्ण केले. घरची परिस्थिती ठीक नव्हती म्हणून 3 वर्ष एका कॉफी शॉपमध्ये एक वेटर म्हणून नोकरी केली. नंतर मनाला वाटलं की आयुष्यभर हेच थोडी करावं काही असं करावं की आपली एक ओळख व्हावी. म्हणून मी पोलीस भरतीची तयारी चालू केली त्यातच आर्मीची सुद्धा तयारी केली.
advertisement
पहिल्या वर्षी मी पोलीस भरतीमधून बाहेर पडलो आणि SSC GD ह्या परीक्षेत पेपरमध्ये बाहेर पडलो. दुसऱ्या वर्षी चांगला अभ्यास केला आणि मेहनतीला फळ आलं. 15 जानेवारी 2026 ह्या दिवशी माझी BSF (Army) मध्ये निवड झाली हा तोच दिवस आहे. ज्या दिवशी Army Day म्हणून साजरा केला जातो. 2 वर्षाच्या प्रयत्नाने मला यश मिळाल्याची भावना विकास याने बोलून दाखवली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Success Story : कॅफेतला वेटर झाला आर्मी जवान, शेतमजूर आईच्या कष्टाचं केलं सोनं, विकासची BSF मध्ये निवड
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement