सोलापूर शहरातील मंगळवार पेठेत राहणारी मोक्षा बेद ही गेल्या 5 वर्षांपासून सीए परीक्षेची तयारी करत होती. वडिलांचं छत्र हरपल्यानंतर परस्थितीशी झगडत तिने अभ्यास सुरूच ठेवला. रोज सहा ते सात तास अभ्यासाला दिला. याच वेळी सोलापुरातील एका खासगी कंपनीत ती काम करत होती. नुकतेच मे 2025 मध्ये झालेल्या सीए परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून तिने 600 पैकी 391 गुण मिळवत घवघवीत यश संपादित केलंय.
advertisement
सीए परीक्षेतमध्ये मिळालेल्या गुणांपेक्षा आपला रँक किती आहे हे महत्त्वाचं आहे. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याने मी अत्यंत आनंदी आहे, असं मोक्षा सांगते. दरम्यान, सोलापूर सेंटरवरून 156 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 26 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मोक्षाने सोलापुरातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
संपूर्ण भारतातून घेण्यात आलेल्या सीए परीक्षेस एकूण एक लाख 42 हजार 402 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14 हजार 247 विद्यार्थी चार्टर्ड अकौंटंट म्हणून पात्र ठरले. यंदा या परीक्षेचा निकाल 10 टक्के इतका लागला आहे. सीए फाउंडेशनचे 82 हजार 662 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 12 हजार 474 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीए परीक्षेची तयारी करत असताना 5 वर्षात मोक्षा यांना आई, भाऊ आणि शिक्षकांची मिळालेला साथ मिळाली. त्यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनामुळेच मी सीएची परीक्षा उत्तीर्ण झाले, असं मोक्षा सांगतात.