पूर्वी चंपारण - सून ही कुटुंबातील लक्ष्मी समान असते. ती कुटुंबाचा मान वाढवते. अशाच एका सुनेने आपल्या कुटुंबाचा मान वाढवला आहे. सासऱ्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुनेने सिव्हिल इंजीनिअरींगची नोकरी सोडली आणि आता ही सून अधिकारी झाली आहे. पल्लवी आनंद असे या सुनेचे नाव आहे. जाणून घेऊयात त्यांची प्रेरणादायी कहाणी.
पल्लवी आनंद यांची कहाणी ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. बिहार लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये पल्लवी आनंद यांनी 182 वी रँक मिळवली आहे. तसेच त्यांची महसूल अधिकारी पदासाठी निवड झाली आहे.
advertisement
त्यांनी एका मोठ्या कंपनीतील सिव्हिल इंजीनिअरींगची नोकरी सोडली आणि नागरी सेवा परिक्षेची तयारी सुरू केली. यानंतर त्यांनी आता आपल्या मेहनतीने आणि कठोर परिश्रमाच्या बळावर यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या सासऱ्यांचे स्वप्नही पूर्ण केले आहे.
पल्लवी आनंद यांनी एमटेकचे शिक्षण पूर्ण कल्यावर एका मल्टिनॅशनल कंपनीत सिव्हिल इंजीनिअरींगची नोकरी केली. मात्र, लॉकडाऊनदरम्यान, त्या गावी परतल्या. यावेळी नागरी सेवा परिक्षेची तयारी करण्याची प्रेरणा त्यांच्या मनात आली. यानंतर त्यांनी या परिक्षेची तयारी सुरू केली.
बीपीएससी परिक्षेत त्यांचा ऑप्शनल विषय हा Sociology होता. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांनी कोणताही क्लास लावला नाही. फक्त घरी राहून त्यांनी यूट्यूबवर अभ्यास केला. तसेच ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यास केला. यासोबतच NCERT च्या पुस्तकांचा खोल अभ्यास केला. Polity साठी लक्ष्मीकांत, तर इतिहासाठी स्पेक्ट्रमचा उपयोग केल्याचे त्यांनी सांगितले.
दररोज 5 ते 6 तास अभ्यास करुन त्यांनी एक रणनीती तयार केली आणि नियमित रुपाने उजळणी केली. कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी सांभाळत त्यांनी वेळेचे व्यवस्थापन केले. त्यांच्या कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे त्यांना तयारी करणे सोपे झाले. त्यांच्या माहेरी त्यांचे आजोबा, काका आणि मामा सह कुटुंबातील अनेकजण प्रशासकीय सेवेत राहिले आहेत. यानंतर आता त्यांनी ही परंपरा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला.
मनासारखा पती किंवा पत्नी हवीये?, तर मग सकाळी ब्रह्म मुहूर्तात उठा अन् फक्त 5 मिनिटे स्वत:साठी द्या
पल्लवी यांचे सासरे विद्यापति झा हे विद्यापती पब्लिक स्कूलचे संचालक आहेत. त्यांनी सैनिकी शाळेतून शिक्षण घेतले होते आणि सैन्यदलात सेवा बजावली होती. मात्र, काही कारणास्तव त्यांना आपली नोकरी सोडावी लागली. आपल्या सुनेने आपले स्वप्न पूर्ण केल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यांना आपल्या सुनेचा प्रचंड अभिमान वाटत आहेत. एक अपूर्ण इच्छा होती, ती पूर्ण झाली असे त्यांनी सांगितले.