2018-19 च्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच या योजनेची घोषणा करण्यात आली होती. जानेवारीमध्ये जीनोम इंडिया प्रोजेक्टवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, 'पीएचडी अभ्यासादरम्यान संशोधनाला पाठिंबा देण्यासाठी पीएम रिसर्च फेलोशिप योजना राबवली जात आहे.' या योजनेबद्दल नवीन माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली आहे की पुढील 5 वर्षांत 10,000 नवीन फेलोशिप दिल्या जातील. मग आता या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? फायदे आणि रक्कम किती यावर एक नजर टाकूया
advertisement
पीएम रिसर्च फेलोशिप योजना काय आहे?
पीएमआरएफ या योजनेअंतर्गत निवडक विद्यार्थ्यांना आयआयटी, आयआयएससी आणि आयआयएसईआर मधील पीएचडी कार्यक्रमांमध्ये थेट प्रवेश मिळतो. याव्यतिरिक्त, दरमहा 70,000 ते 80,000 रुपयांपर्यंतची आकर्षक फेलोशिप देखील मिळते.
किती टप्प्यात पैसे दिले जातात?
पहिले वर्षे - दरमहा 70,000 रु
दुसरे वर्ष - दरमहा 70,000 रु
तिसरे वर्ष - दरमहा 75,000 रु
चौथे वर्ष - दरमहा 80,000 रु
पाचवे वर्ष - दरमहा 80,000 रु
याव्यतिरिक्त, प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी 2 रु लाख (पाच वर्षांसाठी 10 लाखांपर्यंत) संशोधन अनुदान देखील मिळते.
दरम्यान, अलिकडेच ही योजना देशातील सर्व मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठांमधील पात्र विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) आणि केंद्रीय अनुदानीत तांत्रिक संस्था (CFTIs) शी संलग्न संस्थांमध्ये एम.टेक करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मासिक 12,400 ची फेलोशिप दिली जाते.
