भारतीय सैन्याचे आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग
आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग, जालंधर कँट हे बाबा फरिद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, फरिदकोटशी (पंजाब) संलग्न आहे. या ठिकाणी आठ सेमिस्टर म्हणजेच चार वर्षांचा B.Sc नर्सिंगचा डिग्री कोर्स करता येतो. आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंगची (एसीएन) स्थापना लष्करावर अवलंबून असलेल्या महिलांसाठी करण्यात आली होती. या ठिकाणी भारतीय नौदल (आएन) आणि भारतीय हवाई दलाच्या (इंडियन एअर फोर्स) प्रत्येक वार्डासाठी एक जागा राखीव आहे. हे आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (AWES) अंतर्गत कार्य करते, जी 137 आर्मी पब्लिक स्कूल आणि 12 व्यावसायिक प्रोफेशनल कॉलेजेसचं मॅनेजमेंट करते.
advertisement
SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, निकालाची तारीख जाहीर
भारतीय सैन्याच्या आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये प्रवेशाचे क्रायटेरिया
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून किंवा संस्थेतून किमान 45% गुणांसह फिजिक्स, केमेस्ट्री किंवा बायोलॉजी विषयासह 12 वी उत्तीर्ण केली पाहिजे. या सोबतच भारतीय सैन्य, भारतीय वायुसेना व भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांच्या मुलींसाठी एकेक जागा राखीव आहेत.
भारतीय सैन्याच्या आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये कसा मिळवायचा प्रवेश?
उमेदवारांची निवड आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग, जालंधर कँटद्वारे 30 जून 2024 रोजी देशभरातील निवडक केंद्रांवर परीक्षा आयोजित करून घेईल. ही ऑनलाइन प्रवेश परीक्षा ओएटी एसीएन आणि आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, गुवाहाटीसाठीही घेतली जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय याठिकाणी प्रवेश मिळू शकत नाही.