TRENDING:

Railway Jobs : रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कर्मचाऱ्यांची होणार बंपर भरती, जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

Last Updated:

रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. रेल्वेमध्ये विविध पदांसाठी कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Railway Recruitment 2024 : अनेक जण रेल्वेच्या परीक्षा देण्यासाठी तयारी करत असतात. रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. तुम्हाला रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटची सरकारी नोकरी मिळवायची असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने एईसीआर अंतर्गत नागपूर विभागात असिस्टंट लोको पायलटच्या पदांसाठी रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली आहे. या पदांवर नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणारे उमेदवार अर्ज करू शकतात. secr.indianrailways.gov.in या रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांना अर्ज करता येईल. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती प्रक्रिया मोठी असून, जवळपास 600 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
News18
News18
advertisement

रेल्वेच्या या भरतीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असणारे उमेदवार 7 जून किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतून एकूण 598 पदं भरली जाणार आहेत. या पदांसाठी कोणत्या कॅटेगरीच्या किती रिक्त जागा आहेत, त्यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती आणि रेल्वेत लोको पायलट होण्यासाठी वयोमर्यादा काय आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. तुम्हालाही रेल्वेमध्ये लोको पायलटची नोकरी मिळवायची असेल, तर खाली दिलेल्या या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.

advertisement

रेल्वेमध्ये कोणत्या पदांवर होणार भरती?

यूआर (अनरिझर्व्ह्ड कॅटेगरी) - 464 पदं

एससी - 89 पदं

एसटी - 45 पदं

एकूण पदांची संख्या- 598 पदं

रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी पात्रता काय?

जे उमेदवार रेल्वेत नोकरी करू इच्छित आहेत आणि या भरतीसाठी अर्ज करत आहेत, त्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10 उत्तीर्ण केलेली असावी. तसंच, अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्यानंतरच ते सर्व उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र मानले जातील.

advertisement

रेल्वेमध्ये लोको पायलट होण्यासाठी वयोमर्यादा

रेल्वेमध्ये लोको पायलट होण्यासाठी अनरिझर्व्ह्ड कॅटेगरीतल्या उमेदवारांचं वय 18 ते 42 वर्षांदरम्यान असावं. एसटी व एससी कॅटेगरीतल्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 वर्षं ते 47 वर्षांदरम्यान असावी.

रेल्वेत नोकरी कशी मिळेल?

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड कम्प्युटर आधारित चाचणी आणि कम्प्युटर आधारित योग्यता चाचणीच्या आधारे केली जाईल.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
Railway Jobs : रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कर्मचाऱ्यांची होणार बंपर भरती, जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल