गुगल कंपनीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेले तरुण google.com/careers या वेबसाइटवर किंवा लिंक्डइनवर व्हेकन्सी चेक करू शकतात. गुगलने बेंगळुरूमध्ये असलेल्या आपल्या ऑफिसकरिता प्रॉडक्ट मॅनेजर पदासाठी अर्ज मागवले आहेत. त्यासाठी आवश्यक पात्रता, स्किल्स आणि जॉब डिस्क्रिप्शन यांसंदर्भातली माहितीही शेअर करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 60 लाख रुपयांहून अधिक वेतन दिलं जाणार आहे.
advertisement
गुगल मॅप्समध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून नोकरी
सध्याच्या काळात अनेक जण गुगल मॅप्सच्या माध्यमातून रस्ता शोधतात किंवा विशिष्ट ठिकाणाचा शोध घेतात. त्यावरच्या रिव्ह्यूच्या माध्यमातूनही उपयुक्त माहिती मिळते. या गुगल मॅप्स विभागासाठी प्रॉडक्ट मॅनेजर पदाकरिता अर्ज मागवण्यात आले आहेत. गुगल मॅप्समध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून निवड झालेल्या व्यक्तीला ही कामं करावी लागतील.
1 - कंटेंट मॉडरेशन टीमसोबत (रिव्ह्यू, मीडिया) कारण करणं. तसंच, गुगल मॅप्ससाठी अशी नवी मॉडरेशन सिस्टीम सादर करणं, जिच्यामुळे युझर एक्स्पीरिअन्स आणि मॅप्स डेटा क्वालिटी अधिक उत्तम बनू शकेल.
2 - क्रॉस गुगल मॉडेलिंग टीमसह पार्टनरशिप करून युझरची माहिती मिळवणं आणि मशीन लर्निंग सिस्टीमवर काम करणं.
3 - डेटा लेबलिंग टीमसह काम करून डेटा क्वालिटी सुधारणं.
गुगलमधल्या या पदासाठी आवश्यक पात्रत
1 - कम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर्स डिग्री किंवा संबंधित टेक्निकल फिल्डमध्ये डिग्री किंवा या डिग्रीच्या योग्यतेचा प्रॅक्टिकल अनुभव.
2 - प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये 10 वर्षांचा अनुभव.
3 - सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये अनुभव.
गुगलमधल्या या नोकरीसाठी आवश्यक स्किल्स
1 - डेटा अॅनालिसिस स्किल्सवर प्रभुत्व
2 - उत्तम लेखी आणि मौखिक संवाद कौशल्य.
3 - गुगल मॅप्सवर योगदानामध्ये आवड (रिव्ह्यू, फोटो, एडिटिंग).
गुगलमधल्या या नोकरीसाठी किती मिळेल वेतन?
Ambition Box नावाच्या वेबसाइटवर सर्व मोठ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या पदांच्या वेतनाची माहिती देण्यात आली आहे. त्या माहितीनुसार, भारतात गुगल प्रॉडक्ट मॅनेजरला 62 लाख रुपयांपेक्षा अधिक वेतन आहे. वर माहिती दिलेले पात्रतेचे निकष तुम्ही पूर्ण करत असलात, तर उशीर न करता नोकरीसाठी अर्ज करावा. लिंक्डइनवर दिलेल्या माहितीनुसार, या पोस्टसाठी आतापर्यंत 200हून अधिक व्यक्तींनी अर्ज केला आहे.