TRENDING:

Job Vacancy : ISRO मध्ये सरकारी नोकरीची उत्तम संधी! फक्त हवी ही पात्रता, पगार मिळेल 1.77 लाख रुपये

Last Updated:

ज्यांना ISRO मध्ये नोकरी मिळवायची आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी हे महत्त्वाचे मुद्दे काळजीपूर्वक वाचले पाहिजेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 30 डिसेंबर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये सरकारी नोकरी मिळवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. जर तुम्हाला ISRO मध्ये काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही वैज्ञानिक पदांसाठी अर्ज करू शकता. यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले अधिकृत वेबसाइट isro.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी २६ डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
News18
News18
advertisement

उमेदवार 15 जानेवारी 2024 रोजी किंवा त्यापूर्वी या पदांसाठी अर्ज करू शकतात. इस्रोच्या या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण १९ पदे भरण्यात येणार आहेत. जर तुम्हालाही या पदांवर नोकरी मिळवायची इच्छा असेल, तर खाली दिलेल्या या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.

ISRO मध्ये फॉर्म भरण्यासाठी अर्ज फी

जनरल/OBC/EWS उमेदवारांसाठी अर्ज फी - रु. 750

advertisement

SC/ST/PWBD/ESM आणि सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांसाठी अर्ज फी - शून्य

ही पदे भरली जातील ISRO

वैज्ञानिक/अभियंता – SC (कृषी) : 8 पदे

वैज्ञानिक/अभियंता – SC (वातावरण विज्ञान आणि समुद्रशास्त्र) : 8 पदे

वैज्ञानिक/अभियंता – SC (संगणक विज्ञान अभियांत्रिकी) : 3 पदे

ISRO मध्ये नोकरी मिळवण्यासाठी वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 15 जानेवारी 2024 रोजी 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावेत. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही वयात सवलत दिली जाईल.

advertisement

शैक्षणिक पात्रता...

- ISRO Scientist/Engineer – SC (Agriculture) : उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कृषी भौतिकशास्त्र/कृषी हवामानशास्त्र/कृषी विज्ञान या विषयात M.Sc. पदवी प्राप्त केलेली असावी.

- शास्त्रज्ञ/अभियंता – Sc (वातावरण विज्ञान आणि समुद्रशास्त्र) : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून भौतिकशास्त्र/वातावरण विज्ञान/हवामानशास्त्र/समुद्रशास्त्र या विषयात M.Sc.

- शास्त्रज्ञ/अभियंता – S.C (संगणक विज्ञान अभियांत्रिकी) : M.E./M.Tech. इमेज प्रोसेसिंग/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग/ कॉम्प्युटर व्हिजनमध्ये स्पेशलायझेशनसह कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.

advertisement

अशा प्रकारे मिळेल नोकरी

- उमेदवारांची निवड केवळ त्यांच्या लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारावर केली जाईल. लेखी परीक्षेतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे, उमेदवारांना किमान 10 उमेदवारांसह 1:5 च्या प्रमाणात मुलाखतीसाठी निवडले जाईल.

अधिसूचना पहा आणि येथे अर्ज करा

इस्रो भर्ती 2024 अधिसूचना

इस्रो भर्ती 2024 साठी अर्जाची लिंक

advertisement

या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना स्तर 10 अंतर्गत 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये वेतन दिले जाईल. याशिवाय महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि वाहतूक भत्ताही मिळेल.

मराठी बातम्या/करिअर/
Job Vacancy : ISRO मध्ये सरकारी नोकरीची उत्तम संधी! फक्त हवी ही पात्रता, पगार मिळेल 1.77 लाख रुपये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल